support to Supriya Sule of Vanchit Bahujan Aghadi in Baramati lok sabha election Sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: मविआत कोणता पक्ष किती जागा लढवणार? सुळेंनी दिली महत्त्वाची माहीती

सकाळ वृत्तसेवा

Karhad: महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे आठ-दहा दिवसांत महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान राज्यात जेव्हा-जेव्हा भाजप सत्तेवर येतो, त्या वेळी क्राईम वाढते, हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो, अशी टीकाही त्यांनी यावेळी केला.

खासदार सुळे या बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला मेळाव्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या संगीता साळुंखे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडी यावेळी राज्यातील सरकार बदलणार आहे. या महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला या राज्यातून हद्दपार करून पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याची गरज आहे. महाराष्ट्र हा गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही, हे दुर्दैव आहे.

दुधाला दर नाही, शेती अडचणीत आहे. शेती खात्यात ११८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरएसएसने सांगितल्याचे मी वाचले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून कारवाई करायला हवी होती. मात्र, त्यांनी ती केलेली नाही. या सरकारने शेतकऱ्याचे कंबरडे मोडायचे ठरवलेच आहे.’’

चंद्रशेखर बावनकुळे हे सत्तेत आहेत, ते मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे त्यांनी जाहीर करावे, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘दहा वर्षे संसदेत मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मी करत आहे. राज्यघटनेत बदल करावे लागतील, त्यासाठी आम्ही तयार आहोत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT