Surekha Punekar Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

तमाशा ते राजकारण! जाणून घ्या सुरेखा पुणेकरांचा जीवनप्रवास

सुधीर काकडे

प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आजपर्यंत कलेची भरपूर सेवा केली आता गोरगरीब जनता, महिला आणि लोककलावंतांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास व तळमळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ एक तमाशा कलावंत एवढ्यावरच मर्यादित न राहता सुरेखा पुणेकर यांनी लोककला क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांचा हा राजकारणातील प्रवेश महत्वाचा आहे.

पायात घुंगरु बांधून श्रृंगाररसाचं सादरीकरण करणं एवढ्यावरच लावणीला मर्यादीत न ठेवता लावणीला जनमाणसात रुजवण्याचं काम करणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम सुरु केलं. वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशामधून त्यांनी कामाला सुरुवात केली. वडील पुण्यातील रेल्वे स्टेशनवर हमाल होते. हमाली करत करत कोंडीबा टाकळीकर हा त्यांचा तमाशाचा फड देखील चालवायचे. यामुळेच त्यांच्या लावणीला सुरुवात झाली.

तमाशासाठी बैलगाडीमध्ये सामान घेऊन, गावो-गाव फिरायचं असा त्यांचा प्रपंच. पाच बहीणी, आई आणि वडील असं कुटूंब, त्यात तमाशासाठी फिरताना, कुटूंब आणि फडातल्या कलाकारांसाठी भाकरी मागून आणायच्या आणि मग चावडीत एकत्र जेवण करायचं असं त्यांचं जगणं. त्यात पुन्हा पावसाळा सुरु झाला की, तमाशा बंद असायचा. हा सगळा खटाटोप करताना त्यांचं शिक्षणही होऊ शकलं नाही. मात्र कलेची आवड असल्यानं पुण्यात काम करुन मिळालेल्या पैशात त्यांनी कथ्थकचे क्लास केले.

स्वत:चा तमाशा फड

स्वत:चा तमाशा फड...

तेराव्या वर्षी सुरेखा पुणेकर मोठ्या बहिणीसह दत्तोबा तांबे यांच्या तमाशामध्ये काम सुरु केलं. त्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या फडात त्यांनी काम केलं. पुढे त्यांच्या कलेचं सादरीकण चांगलं होत गेल्यानंतर वेगवेळ्या तमाशाच्या फडात त्यांना बोलावलं जाऊ लागलं. मोठी हिम्मत करत बहीण लता पुणेकरसोबत स्वत: तमाशाचा फड सुरु केला. प्रतिकुल परिस्थिती असताना देखील, साठवलेले पैसे आणि लोकांनी केलेल्या मदतीतून हा फड तयार करता आला.

पुणेकर नाव कसं मिळालं...

सुरेखा पुणेकर याच नावाने त्या आज ओळखल्या जात असल्या, तरी त्याच्या वडीलांचं आडनाव मात्र टाकळीकर होतं. पुण्याचं नाव प्रसिद्ध असल्यानं, तमाशाला त्याचा फायदा होईल म्हणून पुणेकर हे नाव दिल्यातं त्या सांगतात. लता सुरेखा पुणेकर या नावानं त्यांचा हा तमाशाचा फड सुरु झाला. तमाशा सुरु केल्यानंतर सुरेखा पुणेकर यांचं वय कमी होतं. तमाशा प्रसिद्ध होत गेला तसा प्रतिस्पर्धी लोकांचा त्रास व्हायला देखील सुरुवात झाली. एकदा घडलेल्या एका मोठ्या घटनेत त्यांच्या फडाची गाडी दरीत कोसळली आणि हे असे वाद नको म्हणून त्यावेळी त्यांनी तमाशा बंद करण्याचा विचार केला.

त्यांच्या लावणीला महाराष्ट्रभारत ओळख मिळाली.

शेवटी कलेची आवड आणि पोटाचा प्रश्न या गोष्टींमुळे त्या जास्त दिवस तमाशापासून दूर राहु शकल्या नाही. तमाशाची पंढरी असलेल्या नारायणगावमध्ये पुन्हा काही दिवसांनी तमाशाला सुरुवात केली. १९९८ च्या लावणी मोहोत्सवात त्यांनी भाग घेतला. याच कार्यक्रमात ‘या रावजी बसा भाऊजी’ या त्यांच्या लावणीनं त्यांनी मोठ-मोठ्या दिग्गजांचं मन जिकलं. राजकारण आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी त्यांच्या कलेचं कौतूक केलं. नृत्त, गायण आणि अदाकारी या तिन्ही गोष्टींचा संगम साधत होणाऱ्या सादरीकरणामूळे त्या मोठ-मोठ्या कलाकारांच्या नजरेत आल्या. पुरुषांची मक्तेदारी असल्याचा शिक्का बसलेल्या लावणीवर त्यांनी ‘नटरंगी नार’ सारख्या खास महिलांसाठी तयार केलेल्या लावणी कार्यक्रमाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. तिथुन त्यांच्या प्रवासाला पुन्हा एकदा गती मिळालं.

पुढे त्यांच्या लावणीला महाराष्ट्रभारत ओळख मिळाली. राज्यात, देशात आणि विदेशात देखील त्यांचे कार्यक्रम गाजले. अमेरिकेच्या मॅडिसन चौकात देखील त्यांच्या लावणीचा कार्यक्रम गाजला. वेगवेळ्या टीव्ही कार्यक्रमांत, चला हवा येऊ द्या, डान्सचे कार्यक्रम आणि मराठी बीग-बॉस २ मध्ये देखील त्या पाहायला मिळाल्या. बैठकीतली लावणी, खडी लावणी अन पतंगाच्या लावणीसह लावण्यांचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सादर केले. त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामामुळे लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर आणि सुरेखा पुणेकर म्हणजे लावणी असं समीकरण तयार झालं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

‘लोककला सादरीकरणाच्या निमित्ताने छोट्याशा खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतचा आजवर खूप मोठा प्रवास झाला. गोरगरीब जनतेचे प्रश्न अडचणी जवळून पहिल्या, खूप वाटायचे त्यांच्या समस्या मांडाव्यात, सोडवून घ्याव्यात; परंतु केवळ भावनिक होऊन गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय ताकदही पाठीशी असायला असे म्हणत त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20WC : पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला; भारतीय गोलंदाजांनी चांगला फास आवळला

Dhule Vidhan Sabha Election : शिवसेना उबाठाला जागा; गोटे उमेदवार की पुरस्कृत? विधानसभा मतदारसंघात रोचक घडामोडी

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - 'बिग बॉस मराठीच्या शूटिंगला सुरुवात; कोण कितव्या स्थानावर?

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Latest Maharashtra News Updates: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचे दिल्ली विमानतळावर आगमन

SCROLL FOR NEXT