Tanaji Sawant_Neelam Gorhe 
महाराष्ट्र बातम्या

Andhare on Gorhe: गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशामुळं तानाजी सावंतांच्या मंत्रीपदावर गदा येणार?; अंधारेंच्या ट्विटमुळं चर्चा

शिवसेनेच्या फुटीच्या एक वर्षानंतर नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत सामिल झाल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Neelam Gorhe enters in Shivsena: ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे. ट्विटद्वारे त्यांनी भाष्य केलं असून यामुळं सध्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Sushama Andhare tweets on Neelam Gorhe entrance in Eknath Shinde Shivsena)

अंधारे यांनी ट्विटद्वारे खोचक टीका करताना म्हटलं की, "तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापतीपद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्य मंत्री पदासाठी अॅडव्हान्समध्ये अभिनंदन...!!"

दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर प्रवेशावेळीच उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर सभांची जबाबदारी देण्यात आल्यानं सहाजिकचं अंधारेंचं महत्व वाढलं. पण यामुळं ठाकरेंच्या गटात असलेल्या इतर महिला नेत्यांना आपलं महत्व कमी झाल्याची भावना वाढली आहे. त्यातून गोऱ्हेंनी देखील ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेच्या फुटीच्या एक वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पाठिंब्याचं कारण जाहीर केलं आहे. केंद्रातील एनडीए सरकारनं घेतलेल्या धडाडीच्या निर्णयांमुळं आपण पुन्हा शिवसेना-भाजप युतीत अर्थात एनडीएत सहभागी झालो आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT