Ajit Pawar Sharad Pawar Raju Shetti Dhananjay Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : 'शरद पवारांच्या पाठीत खंजिर खुपसला, तसंच धनंजय मुंडे एक दिवस अजितदादांच्या पाठीत खंजिर खुपसतील'

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न सोडवलेला नाही; मग त्यांना कोल्हापुरात दोनशे किलो फुलांचा हार का घातला, असा सवालही शेट्टींनी यावेळी केला.

कोल्हापूर : अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीत खंजिर खुपसला, त्याप्रमाणं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) एक दिवस अजित पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसतील, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलाय.

कोल्हापुरात 'स्वाभिमानी'ने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. यावेळी माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न सोडवलेला नाही; मग त्यांनी कोणता पराक्रम केला म्हणून त्यांना कोल्हापुरात दोनशे किलो फुलांचा हार घातला, असा सवालही शेट्टींनी यावेळी केला.

शेट्टी म्हणाले, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसला, त्याप्रमाणे धनंजय मुंडे एक दिवस अजित पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसतील. महाराष्ट्राच्या सत्तेत खोके बहाद्दर बसवले होते. टग्यांचे सरकार आले आहे.

उत्तरदायित्व सभेला वाहतुकीसाठी दोन कोटी आणि मंडपासाठी दोन कोटी कोठून आणले, हे जाहीर करा. कारखाने चालवणे तोट्याचे आहे, तर मग बडे राजकीय नेतेच का विकत घेतात, असाही सवाल शेट्टी, शिवाजी परुळेकर, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT