Swayam Talks Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

स्वयं टॉक्स प्रस्तुत 'अभिमानास्पद महाराष्ट्र'

‘स्वयं टॉक्स’ (Swayam Talks) ने महाराष्ट्रातील 'अभिमानस्पद' गोष्टींची अनोखी वेबसिरीज आणली आहे.

सकाळ डिजिटल टीम

विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या नव्या विचारांच्या आणि प्रतिभेच्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना आणि त्यांचे विचार मांडायचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच ‘स्वयं टॉक्स’ (Swayam Talks) गेल्या दहा वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहे.

महाराष्ट्रातल्या अशाच भन्नाट व्यक्ती आणि संस्थांचं अफलातून काम आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'स्वयं टॉक्स' ने आता 'अभिमानास्पद महाराष्ट्र' (Abhimanaspad Maharashtra) या एका अनोख्या Web series ची निर्मिती केली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि कलावंत आणि ‘स्वयं’चा ह्या क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव ह्यांच्या संगमातून तयार झालेल्या या Web series मुळे महाराष्ट्रातील ह्या आजच्या काळातील यशोगाथा तरुण पिढीपर्यंत आकर्षक पद्धतीने पोहोचतील आणि त्यांचे उत्तम Audio Visual स्वरूपात Documentation होईल.

'स्वयं टॉक्स'चे सह-संस्थापक नविन काळे (Navin Kale) आणि आशय महाजन (Ashay Mahajan) नोव्हेंबर २०२० मध्ये नाशिकच्या प्रवासात होते.

त्यावेळी शेती उद्योगाचे भारी मॉडेल उभे केलेल्या 'सह्याद्री फार्म्स' आणि मूकबधिर मुलांना पैठणी विणण्याचे प्रशिक्षण दिलेल्या 'कापसे पैठणी' ला भेट देण्याचा योग आला.

ते सर्व पाहून या गोष्टी 'फिल्म्स'च्या माध्यमातून सांगण्याची कल्पना त्यांना सुचली. महाराष्ट्रातील अशा कुठल्या गोष्टी फिल्म्सच्या माध्यमातून सांगता येतील याचा शोध घेत असताना त्यांना अशा ३२ गोष्टी सापडल्या.

त्यामधील ४ गोष्टींचा Season One घेऊन 'स्वयं टॉक्स' आता 'अभिमानास्पद महाराष्ट्र' ही web series आता तुमच्यासमोर येत आहे. या Web Series चे लेखन व दिग्दर्शन ओंकार ढोरे (Onkar Dhore) याने केले आहे.

या ४ फिल्म्स कुठल्या आहेत ?

१. 'बोलक्या' पैठणीची गोष्ट

यातील पहिली फिल्म आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या पैठणीची !

येवला येथील 'कापसे पैठणी'चे संस्थापक बाळासाहेब कापसे यांनी 'कापसे फाऊंडेशन'च्या माध्यमातून मूकबधीर मुलांना पैठणी विणण्याचं प्रशिक्षण दिले आणि अशा मुलांसहित अपंग, अनाथ आणि आदिवासी मुलांना त्यांच्या कुटुंबासहित राहण्यासाठी शंभर One BHK फ्लॅट्स बांधले आहेत !

कापसे फाऊंडेशनने आजवर भारतभरातून १०० हुन अधिक मूकबधीर मुलांना पैठणी विणण्याचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.. व्यवसाय आणि समाजकार्याचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या या फिल्मला आवाज दिलाय सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी !

ही फिल्म आता Swayam Talks या YouTube चॅनेलवर पाहता येईल.

सीरिज पाहण्यासाठी क्लिक करा : https://swayamtalks.org/video_category/ams1/

२. इंटरे'स्ट्रिंग' मिरज

सांगली जिल्ह्यात मिरजमध्ये तयार होणारे तंबोरे आणि सतारी जगभरात प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्षे मिरजेचे कारागीर ही वाद्ये घडवत आहेत.

त्याच कारागिरांच्या पुढील पिढीने आता मिरजमध्ये Musical Instruments Cluster निर्माण केले आहे. हाताने एक तंबोरा करायला साधारणपणे २० ते २५ दिवस लागतात. पण मशीनच्या मदतीने तोच तंबोरा सात दिवसांत पूर्ण होतो.

भारतातील हे पहिले आणि एकमेव 'क्लस्टर' आहे जिथे भविष्यात रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरची देखील निर्मिती होणार आहे.

या फिल्ममध्ये सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी मिरजच्या कारागिरांची ही प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे. Swayam Talks या YouTube चॅनेलवर १६ सप्टेंबर रोजी ही फिल्म पाहता येईल.

३. नागझिरातील आशेचा 'किरण'

विख्यात पक्षीतज्ज्ञ आणि निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे त्यांच्या तीन वर्षांपूर्वी पुण्यातील आपलं नागझिरा जंगलात कायमचे राहायला गेले.

आदिवासींची गोंडी कला देशविदेशात पोहोचावी आणि कलेपासून दूर चाललेला आदिवासी टिकून राहावा यासाठी पुरंदरे दाम्पत्याने उद्योग मंदिर सुरू केले असून यामुळे आदिवासी समाजातील स्त्रियांना स्वयंरोजगार मिळत आहे.

तसेच पुरंदरे दाम्पत्याने इथल्या मुलांसाठी 'पाखरशाळा' सुरु केली असून खेळाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं जातंय. पुरंदरे यांच्या कामाची आणि हिरव्यागार जंगलाची ही विलक्षण गोष्ट उलगडली जाईल २३ सप्टेंबर रोजी येणाऱ्या भागामधून - Swayam Talks या YouTube चॅनेलवर पाहता येईल.

४. लोकल माती ग्लोबल माणसं

दुसरी फिल्म नाशिकच्या मोहाडी मधील 'सह्याद्री फार्म्स'वर आधारित आहे. विलास शिंदे या शेतकरी तरुणाने सहकारी शेतकऱ्यांना घेऊन शेती व्यवसायाचे भारी मॉडेल उभं केलंय.

चार कंटेनरपासून सुरु झालेला प्रवास आज १,२०० कंटेनरच्या पुढे गेला आहे. 'सह्याद्री फार्म्स'ने ग्लोबल मार्केटची गरज ओळखत उत्तम प्रतीची फळे जगभरात पोहोचवायला सुरुवात केली आहे.. आज तब्बल ४२ देशांमध्ये 'सह्याद्री' पोहोचली आहे.

शेतकऱ्यांना एकत्र करून नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची 'ग्लोबल' कंपनी उभारणाऱ्या 'सह्यादी फार्म्स'ची गोष्ट Swayam Talks या YouTube चॅनेलवर ३० सप्टेंबर पासून पाहता येईल.

या फिल्म्सची निर्मितीमूल्ये उच्च दर्जाची असावीत या दृष्टीने फिल्म तयार करण्यासाठी रणजित गुगळे, वरुण नार्वेकर आणि ओंकार ढोरे यांच्या व्यावसायिक टीमची (बहावा एंटरटेनमेंट) मदत घेतली गेली आहे.

आपल्या महाराष्ट्रातील या 'अभिमानस्पद' गोष्टी संपूर्ण देशभर पोहोचाव्यात यासाठी ही Web Series हिंदी भाषेत देखील डब करण्यात आली असून या फिल्म्स Swayam Talks Hindi या YouTube चॅनेलवर वर दिलेल्या तारखांपासून उपलब्ध असतील. 

प्रेक्षकांना या सर्व फिल्म्स कुठल्याही जाहिरातींशिवाय पाहायच्या असतील तर या चारही फिल्म्स Swayam Talks App वर उपलब्ध आहेत. 

"अभिमानास्पद महाराष्ट्र' या Web Series मधून महाराष्ट्रातील अभिमानास्पद गोष्टी जागतिक दर्जाच्या फिल्म्समधून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय.

आमची खात्री आहे की महाराष्ट्राच्या जनतेला त्या आवडतील आणि या फिल्म्स ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवतील.

या फिल्म्स पाहून एक माणूस जरी पेटून उठला आणि भविष्यात या web series चा विषय झाला तर आमच्या या प्रयत्नांचं चीज झालं असं म्हणता येईल !" असं स्वयं टॉक्स चे नविन काळे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT