women hypertension sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरातील 2.78 लाख लोकांमध्ये हायपर टेन्शनची लक्षणे; जीवनशैली बदलल्याने मधुमेहाचेही 97 हजारांवर संशयित रुग्ण; ‘या’ तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण, नेमकी कारणे कोणती?

आरोग्य विभागाने सोलापूर जिल्ह्यातील ३० वर्षांवरील व्यक्तींचा सर्व्हे केला. त्यातील संशयितांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. १३ लाख ६४ हजार व्यक्तींची माहिती संकलित झाली असून त्यात दोन लाख ७८ हजार २७२ जणांमध्ये उच्चरक्तदाबाची तर ९७ हजार ६५९ जणांमध्ये मधुमेहाची लक्षणे आढळली आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : वयाच्या ३० वर्षांनंतर अनेकांना उच्चरक्तदाब (हायपर टेन्शन), मधुमेहाची लक्षणे जाणवू लागतात आणि काहींचा मग अकाली मृत्यू होतो. हा प्रकार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने ३० वर्षांवरील व्यक्तींचा सर्व्हे केला. त्यातील संशयितांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात १३ लाख ६४ हजार व्यक्तींची माहिती संकलित झाली असून त्यात दोन लाख ७८ हजार २७२ जणांमध्ये उच्चरक्तदाबाची तर ९७ हजार ६५९ जणांमध्ये मधुमेहाची लक्षणे आढळली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाने ३० वर्षांवरील व्यक्तींचा केलेल्या सर्व्हेनुसार मार्च ते सप्टेंबर २०२४पर्यंत ७९ हजार ५३५ रुग्ण उच्चरक्तदाबाचे तर ४६ हजार ६५९ रुग्ण मधुमेहाचे आढळले आहेत. याशिवाय तोंडाचा कर्करोग असलेले ४५ तर स्तनाचा कर्करोग असलेले ६८ जण आढळले आहेत. या सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. कोणत्याही आजाराचे निदान वेळेत झाल्यास संभाव्य धोका टाळता येतो. या पार्श्वभूमीवर या रुग्णांवर नियमित उपचार सुरू असून त्यांना औषधे देखील देण्यात आली आहेत.

डॉक्टर व आशा सेविकांच्या माध्यमातून त्यांच्यावर देखरेखही सुरू आहे. अजूनही जिल्ह्यात सर्व्हे सुरु असून यात ३० वर्षांवरील प्रत्येक सदस्यांचे आधार क्रमांक घेतले जातात. त्यांच्याकडून एक अर्ज म्हणजेच त्या अर्जातील प्रश्नांवर माहिती घेतली जाते. प्रत्येकाला आपल्याला कोणता आजार किंवा आजाराची लक्षणे आहेत का हे वेळेत समजावे व त्यांना उपचार घेऊन बरे होता यावे आणि त्यातून संभाव्य धोका टळावा हाच या सर्व्हेचा हेतू असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

तालुकानिहाय संशयित रुग्ण

  • तालुका उच्चरक्तदाब मधुमेह

  • अक्कलकोट २३,७३९ ८,३२३

  • बार्शी २४,०७७ ८,४४१

  • करमाळा २१,७६३ ७,६३०

  • माढा २७,५७२ ९,६६७

  • माळशिरस ४५,०५६ १५,७९७

  • मंगळवेढा १७,४२० ६,१०८

  • मोहोळ २३,५७३ ८,२६५

  • पंढरपूर ३२,७६८ ११,४८८

  • सांगोला २७,५९७ ९,६७५

  • उत्तर सोलापूर १०,०१० ३,५१०

  • दक्षिण सोलापूर २४,४६७ ८,६५९

  • एकूण २,७८,२७२ ९७,५६१

वेळेत निदान झाल्यास बरा होण्याची संधी

उपकेंद्र स्तरावर समुदाय आारोग्याधिकारी आपल्याकडे येतील, त्यावेळी उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग याची तपासणी करून घ्यावी. वेळेत निदान झाल्यास उपचार करून आजाराची गुंतागुंत टाळता येईल. बदलती जीवनशैली, अपूर्ण झोप, कामाचा ताण, अवेळी जेवण अशा कारणांमुळे बहुतेक आजार होतात. प्रत्येकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, जेणेकरून मधुमेह, उच्चरक्तदाब असे आजार टाळता येतील.

- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT