Sanjay Raut_Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

"दिल्लीच्या दिशेने झेप व्हाया दादरा नगर हवेली"; संजय राऊतांचं ट्विट

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार मिळवण्याच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दिल्लीच्या दिशेने झेप घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत असल्यानं आणि यामध्ये शिवसेनेची घोडदौड सुरु असल्यानं संजय राऊत यांनी नुकतचं ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा आपला फोटो पोस्ट केला असून याला कॅप्शन म्हणून "महराष्ट्राच्याबाहेर पहिलं पाऊल दिल्लीच्या दिशेने झेप व्हाया दादरा नगर हवेली" असं कॅप्शन दिलं आहे.

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येमुळं दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होत आहे. सध्या इथे मतमोजणी सुरु असून या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्य लढत आहे. इथून शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तिकिट दिलं आहे. त्यांची मुख्य लढत भाजपाच्या महेश गावित आणि काँग्रेसच्या महेश दोढी यांच्याबरोबर आहे. मतमोजणीच्या तासाभराच्या कलानुसार, कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या गावित यांच्यावर ५,५०६ मतांनी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या दोढी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra : 1cm ने हुकलो! नीरज चोप्राच्या हातातून थोडक्यात 'Diamond' निसटला; पठ्ठ्याने जेतेपदासाठी पूर्ण जोर लावला

Neeraj Chopra ने 0.01m च्या फरकाने जेतेपद गमावले; पण, Prize Money म्हणून वाचा किती कमावले...

UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; 8-10 जण अडकले

Duleep Trophy 2024: तिलक वर्मा-प्रथम सिंग यांची शानदार शतके; भारत अ संघाला विजयाची संधी

Crime: भांडुप हादरलं! बोलण्यास नकार; युवक संतापला, रागात महिलेवर चाकूने वार, नंतर स्वत:चा चिरला गळा

SCROLL FOR NEXT