खर्च करण्याचे नियोजन करा esakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणुकीत खर्च जरा सांभाळून! उमेदवारांना दररोज द्यावा लागणार हिशेब; २५ दिवसांत ९५ लाखांच्या खर्चाचे बंधन; प्रत्येक सभा, कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्ज केल्यापासून मतमोजणी होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांच्याच खर्चाची मर्यादा आहे. निवडणूक काळात उमेदवाराला दररोज झालेला खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्या दिवशी द्यावा लागेल.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्ज केल्यापासून मतमोजणी होईपर्यंत (१२ एप्रिल ते ७ मेपर्यंत) प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांच्याच खर्चाची मर्यादा असणार आहे. निवडणूक काळात उमेदवाराला दररोजचा झालेला खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्या दिवशी सादर करावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे, पण सोलापूर लोकसभेसाठी भाजप व काँग्रेसचा उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपने पुन्हा एकदा मैदानात उतरविले आहे. पण, मोहिते-पाटलांची नाराजी अजून संपलेली नाही. दुसरीकडे या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही अंतिम झालेला नाही. तरीदेखील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी सुरू केली असून उर्वरित पथके जिल्हाभर फिरत आहेत. प्रशासनाकडून निवडणूक प्रचार काळातील व्हिडिओ शूटिंगसाठी २१८ जणांची नेमणूक केली आहे. तसेच स्वतंत्र ६१ पथके देखील नेमली आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून होणाऱ्या सभा, सार्वजनिक कार्यक्रम व उपक्रमातील खर्चावर प्रशासनाचा कटाक्ष राहणार आहे.

प्रचारासाठी उमेदवारांना १६ दिवसांचा अवधी

लोकसभा निवडणुकीसाठी १२ एप्रिलपासून १९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर अर्ज भरल्यापासून २२ एप्रिल ते ७ मे अशा १६ दिवसांत उमेदवारांना प्रचार करण्यास वेळ आहे. पण, मतमोजणीसाठी तब्बल २८ दिवस वाट पाहावी लागणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे.

पोस्टर, बॅनर काढण्याची मुदत संपली

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ७२ तासांत प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांचे पोस्टर, बॅनर, डिजिटल स्वत:हून काढून घेणे किंवा झाकून ठेवणे बंधनकारक आहे. ज्याठिकाणी असे राजकीय पोस्टर, डिजिटल दिसतील ते प्रशासनाच्या वतीने काढले जाणार आहेत. दरम्यान, आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी करण्यासाठी नागरिकांना C-vgil ॲप देण्यात आले आहे. त्यावर कोणीही तक्रार करू शकतो. सध्या जिल्हा प्रशासनाकडे बॅनर न काढल्याच्या पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

दररोजच्या खर्चाचा हिशेब दुसऱ्या दिवशी अपेक्षित आहे

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची माहिती आम्हाला सादर करावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती, पथके नेमली आहेत. दररोजच्या खर्चाचा हिशोब दुसऱ्या दिवशी देणे अपेक्षित आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT