admission  esakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या निकालानंतर प्रवेश घेताय का? विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘हे’ पर्याय आहेत खुले; अचूक प्रवेश घ्या अन्‌ करिअरची दिशा निश्चित करा, नक्की वाचा

बारावी आणि दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना कला (बीए), वाणिज्य (बीकॉम), विज्ञान (बीएससी) शाखेशिवाय अभियांत्रिकीसह लॉ, डीएड, फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : बारावी आणि दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना कला (बीए), वाणिज्य (बीकॉम), विज्ञान (बीएससी) शाखेशिवाय अभियांत्रिकीसह लॉ, डीएड, फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी आहे. प्रवेशावेळी पालकांनी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी. जेणेकरून भविष्यात तो त्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी साडेसोळा ते १९ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

याशिवाय बारावीनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, मेडिकल, कला (एमपीएससी, युपीएससी व्यवस्थित तयारी, अभ्यास केल्यास), जिओग्रॅफीकल सर्व्हे ऑफ इंडिया सर्वेअर म्हणून संधी मिळू शकते. नर्सिंग, पॅथॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बायोइन्फॉरमेटिक्स, डीएड, बीएसएल, फार्मसी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, बीएससी, बीएससी ॲग्री, बीए, बीकॉम, बीबीए, बीसीए, बीबीएम, फॉरेन लॅंग्वेज अशा अभ्यासक्रमांसाठी देखील प्रवेश घेता येईल.

विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी संपूर्ण माहिती

बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजची वेबसाईट पाहावी व तेथील प्रवेश प्रक्रिया पहावी, त्याठिकाणी भेट देऊन प्रवेश व अभ्यासक्रम, विषयांची माहिती घ्यावी. सध्या कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे कल जास्त असून स्वायत्त महाविद्यालयांमध्ये त्यादृष्टीने भरपूर कोर्सेस आहेत. त्या त्या महाविद्यालयांमधील विषय पाहून आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला शाखेचा विद्यार्थी ‘विज्ञान’ व ‘वाणिज्य’चा विषय देखील घेऊ शकतो. त्याला आवडीच्या विषयाची माहिती त्यातून मिळू शकते.

- डॉ. संतोष कोटी, प्राचार्य, वालचंद आर्ट्‌स ॲण्ड सायन्स, सोलापूर

महत्त्वाची काही संकेतस्थळे

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट) www.dte.org.in, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (www.dmer.org), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (www.dvet.gov.in), भारतीय प्रौद्योगिक संस्था आयआयटी, जेईईसंबंधी (बी.टेक पदवी) www.iitb.ac.in, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) www.aipmt.nic.in, ‘एनडीए’ प्रवेश परीक्षांसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोग www.upsc.gov.in.

बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी

  • १) बीबीए, बीबीएम व बीसीए

  • कालावधी : तीन वर्षे

  • प्रवेश : सीईटी किंवा गुणवत्ता यादीनुसार थेट प्रवेश

  • संधी कोठे? : औद्योगिक व आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा

----------------------------------------------

२) फॉरेन लॅंग्वेज (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)

कालावधी : बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित तांत्रिक शिक्षण

----------------------------------------------

३) इंजिनिअरिंग डिप्लोमा

  • कालावधी : तीन वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश

  • संधी कोठे? : आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग- व्यवसाय, स्वयंरोजगार

  • उच्च शिक्षण : बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

--------------------------------------------

४) बीई

  • कालावधी : चार वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी विज्ञान, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

  • संधी कोठे? : स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी व अभियांत्रिकी सेवा परीक्षा

  • उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

---------------------------------------------

५) बीटेक

  • कालावधी : चार वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई

  • संधी कोठे? : औद्योगिक क्षेत्र, सरकारी व खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

  • उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

------------------------------------------------------

६) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी

  • कालावधी : चार वर्षे

  • पात्रता : बारावी शास्त्र, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

  • पुढील शिक्षण : ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण

--------------------------------------------------

७) टूल ॲण्ड डाय मेकिंग

  • कालावधी : चार वर्षे

  • पात्रता : दहावी- बारावी पास

  • संधी : टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर (जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ)

-------------------------------------------------

८) डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी

  • कालावधी : तीन वर्षे

  • पात्रता : बारावी (किमान ७० टक्के)

  • संधी कोठे : प्लॅस्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी

-------------------------------------------------------

९) बीआर्च

  • कालावधी : पाच वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, एनएटीए, जेईई

  • संधी कोठे? : स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा

  • उच्च शिक्षण : एमआर्च, एमटेक

-----------------------------------------------------

१०) एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीडीएस

  • कालावधी : साडेपाच वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, नीट

  • संधी कोठे? : स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

-------------------------------------------------

११) बीएससी इन नर्सिंग

  • कालावधी : चार वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र व नीट उत्तीर्ण

  • संधी कोठे? : रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी

-------------------------------------------------

१२) बीव्हीएससी ॲण्ड एएच

  • कालावधी : पाच वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र व नीट

  • संधी कोठे? : प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

----------------------------------------------------

१३) डी- फार्मसी, बी-फार्मसी

  • कालावधी : चार वर्षे

  • पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

  • संधी कोठे? : औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेत नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT