raanbhaji google
महाराष्ट्र बातम्या

तांदूळजाची भाजी आणि सूप

दिपाली सुसर

तांदुळजा ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे. शरीराला सी जीवनसत्व मिळावे असे तर तांदुळजाची भाजी खावी असं सांगितल जात.

ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे म्हणजे खायला थंड आहेत

जर कुणाला गोवर कांजण्या झाल्या किंवा अंगाला खुप ताप असला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त असतो .

तांदुळजाची पातळ सुप वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते. आजच्या काळात बरेच आरोग्याची काळजी करणारे लोक सूप खाणे पसंद करतात. 

विशेष म्हणजे जून महिण्याच्या काळात ही तांदुळजाचे सूप आणखीच चवदार लागते कारण भाजी नुकतीच उगवुन आलेली असते त्यामुळे कोवळया तांदुळजाचे सूप भारी लागतं

आता पाहु या तांदुळजाचे सूप आणि भाजी नेमकी करायची कशी..?

*तांदुळजाच्या सुपा करता लागणारे साहित्य:

1) तांदुळजाच्या भाजीच्या दोन जुडया

2) सात आठ लसून पाकळ्या,बारीक चिरलेला कांदा

3) एक चमचा बेसन

4) जिरे पावडर,

5) दोन कप पाणी

6) तेल ,मीठ

कृती:

• सर्वप्रथम तांदुळची भाजी स्वच्छ निवडुन घ्यावी त्यानंतर पाण्यांने धुवून घेऊन बारीक चिरुन घ्यावी.

• पॅनमध्ये १ चमचा तेल घेवून त्यात जिरे पावडर घालावी.

• नंतर त्यात कापलेला लसण व चिरलेला कांदा सोडायचा कांदा लसण हलके लाल होईपर्यंत चांगले फ्राय करायचे व नंतर त्यात तांदुळजाची चिरलेली भाजी टाकुन पाच मिनिटे मंद गॅसवर ते परतून घ्यायचे. नंतर मग त्यात बेसन घालुन आपल्या चवीनुसार मीठ घालायचे.

• त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करुन त्यात २ कप कोमट पाणी घालायचे.आणि हे मिश्रण गॅसवर चांगले ४-५ मिनिटे उकळुन दयायचे.

• हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडर मध्ये घालून ह्याचे मुलायम असे पातळ सूप करुन घ्यायचे आणि मग तयार झालेले सूप गॅसवर ठेवुन थोडे गरम करुन खायला घ्यायचे

तुम्ही हे सूप तसेच खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाल्ले तरी भारी लागेल.

जर तुम्हाला सूप नसेल आवडत तर तुम्ह तांदुळजाची भाजी

करु शकता ती कशी करायची तेही आम्ही सांगणार आहोत

*तांदुळजा भाजीकरता लागणारे साहित्य:

1)तांदुळजाची भाजी १ जुडी

2)४-५ लसूण पाकळ्या

3)मीठ,तेल

4) लाल मिरचीचे तुकडे

5)जिरे, मोहरी

कृती:

• तांदुळजाची भाजी निवडून घ्यावीत. त्यात भाजीच्या कोवळ्या काड्या सुध्दा घ्याव्या. नंतर ती भाजी स्वच्छ पाण्यात २-३ वेळा धुवुन बारीक चिरुन घ्यावी.

•कढईत थोड पाणी टाकून भाजी वाफवून काढुन घ्यावी नंतर कढईत थोडं तेल टाकुन तापवून घ्यावे. (कढई लोखंडाची असेल तर उत्तम). तापलेल्या तेलात लसूण, जिरे मोहरी, लालमिरचीचे तुकडे खालुन खमंग फोडणी घालावी. अन मग वरुन वाफवून घेतलेली भाजी घालून मीठ घालावे.

• गॅस कमी करुन कढई २-३ मिनीटे झाकून ठेवावी. थोड्यावेळान भाजी कोरडी होते तेव्हा भाजी शिजली आहे हे समजून गॅस बंद करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Toll Waiver: मुंबईकर 'टोल'मुक्त! शहरातील पाचही टोल नाक्यांवर 'या' वाहनांना आता भरावा लागणार नाही शुल्क

Mukesh Ambani: मुकेश अंबानी बॉलीवूडवरही करणार राज्य; करण जोहरची कंपनी घेणार विकत

खूब लड़ी मर्दानी! Harmanpreet Kaur ची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार फिफ्टी

Diwali 2024 Fashion Tips: तुम्हालाही सणासुदीत परफेक्ट लूक हवायं? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये 'या' 4 प्रकारच्या साड्या असल्यास पाहिजेत

Bhavish Aggarwal: ओलाला आणखी एक झटका! ग्राहकांकडून घेतलेले पैसे बँक खात्यात परत करावे लागणार, CCPAने दिले आदेश

SCROLL FOR NEXT