Dr. Tara Bhawalkar 
महाराष्ट्र बातम्या

Who is Tara Bhawalkar : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

Tara Bhawalkar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2024 Latest News : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. ६) पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ५ ः दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २१, २२ आणि २३ फेब्रुवारीला दिल्लीत हे संमेलन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. ६) पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील अवघ्या सहाव्या महिला संमेलनाध्यक्ष ठरल्या आहेत. यापूर्वी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. डॉ. अरुणा ढेरे यांनी २०१९ मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर पाच वर्षांनी महिला साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदावर निवडल्या गेल्या आहेत.

संमेलनाध्यक्षपदासाठी यंदा डॉ. भवाळकर यांच्यासह कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे आदींची नावे चर्चेत होती. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी यांनी भूषवले होते. आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. तसेच, दिल्लीतील संमेलनाचे अध्यक्ष निवडताना वादग्रस्त नसतील आणि सर्वांची संमती असेल, असे अध्यक्ष निवडण्याची भूमिका महामंडळाची होती. त्यातून डॉ. भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT