tarabai modak sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din : ताराबाई मोडक : मुलं शाळेत येत नाहीत म्हटल्यावर त्यांनी शाळाच रानात नेली

रात्रशाळा, व्यवसाय शिक्षण, असे विद्यार्थ्यांच्या सोयीचे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे उपक्रम ताराबाईंनी राबवले.

नमिता धुरी

मुंबई : भारतातील पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या जनक ताराबाई मोडक यांची आज जयंती. ताराबाई या चाकणच्या केळकर घराण्यातील असल्या तरी त्यांचा जन्म मात्र मुंबईत झाला. पुढे त्यांचा विवाह कृष्णा मोडक यांच्याशी झाला.

ताराबाई मोडक यांनी बालशिक्षणात खूप मोठे कार्य केले. त्या बीएपर्यंत शिकलेल्या होत्या व राजकोट येथील बार्टन महिला कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या पहिल्या भारतीय प्राचार्य होत्या. त्यांनी ती नोकरी सोडली व बालशिक्षणविषयक कार्य सुरू केले.

(tarabai modak ECCE early childhood care and education pre primary education history anganwadi history Meadow School ) हेही वाचा - What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष ?’

भावनगर येथे गिजुभाई बधेका यांच्यासोबत ताराबाई काम करू लागल्या. शिक्षणाचा पाया मुलांच्या बालवयातच घातला गेला पाहिजे या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी शिक्षणपत्रिका काढण्यास सुरुवात केली.

१९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९४८ पर्यंत त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन केली बालशिक्षण कार्य सुरूच ठेवले. येथेच पुढे स्थापन झालेल्या पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिरातून मराठी आणि गुजराती भाषेतील शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.

गिजुभाईंच्या मृत्यूनंतर १२ वर्षे ताराबाईंनी नूतन बालशिक्षण संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार सुरू ठेवला. १९४५ साली त्यांनी ठाण्यातील बोर्डी येथे बाल ग्रामशिक्षा केंद्र स्थापन केले.

बालशिक्षणाचा लाभ आदिवासींना मिळावा म्हणून त्यांच्या अंगणात बालवाड्या सुरू केल्या. येथूनच अंगणवाडी ही संकल्पना जन्माला आली. त्यांना शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांची साथ लाभली.

पुढे त्यांनी कोसबाड येथे कार्य सुरू केले. कोसबाड येथील शाळेत ६ ते १४ वयोगटातील मुलांना आणणे हे मोठे आव्हान होते. यासाठी त्यांनी दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, गृहभेटी असे बरेच उपक्रम राबवले.

ही मुले शाळेत न येता रानात गुरांना चरायला नेत. अशा वेळी ताराबाईंनी शाळाच रानात नेण्याची अभिनव संकल्पना राबवली. मुलांना रंग, स्पर्श, वजन, माप, इत्यादी संकल्पना समजण्यासाठी त्यांनी मुलांच्या भावविश्वातील पिसे, शंख, दगड, बिया, माती ,रेती, इत्यादी साहित्य वापरले. या शाळा कुरणशाळा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

रात्रशाळा, व्यवसाय शिक्षण, असे विद्यार्थ्यांच्या सोयीचे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे उपक्रम ताराबाईंनी राबवले. भारतातील बालशिक्षणाचा पाया ताराबाई मोडक यांच्यामुळेच भक्कमरित्या रोवला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT