Tashkent Files esakal
महाराष्ट्र बातम्या

Tashkent Files : नक्की का झालेला ताश्कंद करार? कोणती कलमं झालेली यात मंजूर?

ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला

सकाळ डिजिटल टीम

Tashkent Files : भारताचे पाकिस्तानाबरोबर आत्तापर्यन्त खूप मोठे असे 4 युद्ध झालेत, त्यातलं एक म्हणजे १९६५ चे युद्ध, ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन जिब्राल्टर या नावाने मोहीम काढून जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सैन्य घुसवले.

प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला केला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चाललेले हे युद्ध संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी कराराने थांबलं.

दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक या युद्धात मारले गेले आणि असं म्हटलं जातं की, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते.

सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णित अवस्थेतच थांबले. या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि चीनमध्ये अधिक जवळीक झाली.

ताश्कंद करार

ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद मध्ये १० जानेवारी १९६६ रोजी केला गेलेला.

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.

सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या.

४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी शामिल होते.

करारात एकूण नऊ कलमं ठरली होती.

(१) संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.

(२) २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले. यांशिवाय करारातील इतर कलमे पुढीलप्रमाणे आहेत.

(३) एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.

(४) एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.

(५) एकमेकांचे राजदूत परत स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.

६) एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.

(७) युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.

(८) उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.

(९) अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे.

या करारात पाकिस्तान परत कधीच युद्ध करणार नाही असाही एक कलम होता जो अमान्य केला गेला आणि ही दहा कलमं ठरली.

ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT