satyajeet tambe eSakal
महाराष्ट्र बातम्या

Team India Parade: हा तर शुद्ध वेडेपणा! दुसरे हाथरस घडले असते; टीम इंडियाच्या मिरवणुकीवर सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

Satyajeet Tambe On Team India Parade: अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विजयी भारतीय क्रिकेट टीमची मुंबईमध्ये भव्य मिरवणूक झाली. यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. चाहते इतक्या मोठ्या संख्येने आले होते की, काही ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमध्ये हाथरससारखी घटना घडली नाही, याबाबत देवाचे आभार. 'फर्स्ट कम, फर्स्ट सीट' अशा प्रकारची सुविधा वानखेडेवर करण्यात आली होती. प्रशासनाकडून हे किती बेजबाबदार प्रकारचं नियोजन होतं. इतकी मोठी रिस्क प्रशासनाने कशी घेतली? काहीच दिवसांपूर्वी हाथरसमधील चेंगराचेंगरीl १२१ लोक मृत्युमुखी पडलेत, हे प्रशासन विसरलंय का? असा सवाल तांबे यांनी केलाय.

हे देशाबाबत किंवा क्रिकेट टीमबाबत प्रेम नाही तर हा शुद्ध वेडेपणा आहे. गोंधळ आणि बेजबाबदारपणा पेक्षा सुरक्षा आणि शहाणपणाला जास्त महत्त्व द्या, असं तांबे म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.



गर्दीच्या नियोजनात प्रशासन अपयशी

भारत माता की जय, मुंबईचा राजा रोहित शर्मा, बूम बूम बुमराह... अशा घोषणाबाजीमुळे संपूर्ण चर्चगेट स्थानक परिसर दुपारपासून दुमदुमून गेला होता. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचे पोस्टर घेऊन हजारोंच्या जथ्थ्याने क्रिकेटप्रेमी चर्चगेट स्थानकावर जमत होते. अनपेक्षित गर्दी झाल्यामुळे आणि ढिसाळ सुरक्षा नियोजनामुळे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले.

दोन तास उशीर

टी-२० वर्ल्डकप जिंकून चार दिवस झाले. त्यामुळे विजय मिरवणुकीची तयारी अगोदर होणे अपेक्षित होते; मात्र ढिसाळ नियोजनामुळे चर्चगेट ते नरिमन पॉईंटदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासनाला अपयश आले. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे पाच वाजता ठरलेल्या मिरवणुकीला दोन तास उशीर झाला.

मुख्यमंत्र्याचा फोन

क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरिमन पॉईंट ते स्टेडियमदरम्यान, मरीन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतूक विस्कळित होऊ नये; तसेच जमलेल्या क्रिकेटप्रेमींना कोणताही त्रास होऊ नये, याकडे मुंबई पोलिस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, आनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT