KCR esakal
महाराष्ट्र बातम्या

BRS : तेलंगणा मुख्यमंत्र्यांची आज महाराष्ट्रात ग्रँड एंट्री! ३०० गाड्यांचा ताफ्यासह सोलापूरात धडकणार 'बीआरएस'

रोहित कणसे

तेलंगाणामध्ये सत्तेत असलेला पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रात पाय पसरू पाहतो आहे. राज्यात विस्तारासाठी अवश्यक असे सर्व मार्ग आवलंबले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सध्या बीआरएसटी वाट धरली आहे. या पार्श्वभूमिवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू होत असलेल्या या दौऱ्याल विषेश महत्व मिळताना दिसत आहे.

३०० गाड्या अन् हॉटेल रुम्स

तेलंगणामधून तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात ग्रँड एंट्री होणार आहे. केसीआर यांच्यासोबत बीआरएसचे अनेक नेते हैदराबाद येथून महाराष्ट्रासाठी निघणार आहेत. या ताफ्यात मंत्री, आमदार, खासदार यांच्या तब्बल ३०० वाहनांचा समावेश असणार आहे.

बीआरएसचे नेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ब्रेक घेतील आणि नाष्टा देखील करतील. त्यानंतर या सर्वांचा पहिला मुक्काम हा सोलापूर येथे असणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील हॉटेलमध्ये तब्बल ३०० रुम या नेत्यांसाठी बुक करण्यात आली आहे.

केसीआर यांनी मराठवाड्यातील नांदेड येथून महाराष्ट्रात प्रचाराला सुरूवात केली होती, नांदेड येथे घेतलेल्या सभेत त्यांनी अबकी बार किसान की सरकार असी घोषणा दिली होती. आता वारकरी शेतकऱ्यांवर लक्ष ठेवून केसीआर पंढरपूर आणि सोलापूर येथे केसीआर दाखल होणार आहेत. केसीआर यांच्याकडून वाखरी येथील रिंगण सोहळा आणि पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याची परवानगी देखील मागण्यात आली होती, मात्र प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे.

भालके यांचा पंढरपूरात बीआरएसमध्ये प्रवेश

बीआरएसमध्ये बरेच स्थानिक नेते आज प्रवेश करू शकतात, राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांचा पक्षप्रवेश देखील आज पंढरपूर येथे होणार आहे. त्यांच्यासोबत इतरही काही नेते बीआरएसची वाट धरू शकतात.

बीआरएस पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. बीआरएस पदा अधिकाऱ्याने सांगितले की, राव सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे पोहोचतील आणि त्यानंतर सोलापूरला रवाना होतील. यानंतर मंगळवारी ते सोलापूरच्या पंढरपूर शहरातील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पूजा करतील.

राव सोलापूरच्या सरकोली गावात स्थानिक पातळीवर आयोजित कार्यक्रमात देखील सहभागी होतील आणि नंतर उस्मानाबादमधील तुळजापूरला रवाना होतील, जिथे ते मंगळवारी दुपारी प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिरात दर्शन घेतील, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न

तेलंगणाबाहेर संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने राव यांनी १५ जून रोजी नागपुरात पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केसीआरच्या नेतृत्वाखालील पक्षाने अखिल भारतीय पक्ष बनण्याच्या उद्देशाने तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले आहे.

याशिवाय राव यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या काही भागांत सभा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर शेतकरी आणि दलितांच्या प्रश्नावर टीका केली.

यानंतर आता महाराष्ट्रातील प्रचलित पक्ष सध्या वेगवेगळ्या जातीपातींमध्ये विभागलेलं आहे, याचा थेट फायदा महाराष्ट्रात बीआरएसला होऊ शकतो अशी चर्चा देखील महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbadevi Assembly Constituency: ''इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे'' अरविंद सावंतांची जीभ घसरली; शायना एनसींचं प्रत्युत्तर

IND A vs AUS A: मुकेश कुमारच्या ६ विकेट्स अन् ऑस्ट्रेलिया ऑलआऊट! भारताला आता पुनरागमनाची संधी

Firing In Yerawada: ऐन दिवाळीत येरवडा हादरले, गोळीबारात एकजण जखमी

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Bhau Beej 2024 Makeup Tips: डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी असा करा 'ग्लिटर आय मेकअप', सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

SCROLL FOR NEXT