Accident News esakal
महाराष्ट्र बातम्या

Accident News: तेलगी प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचा टॅक्सीच्या धडकेत मृत्यू!

तेलगी गैरव्यवहारातील तपास अधिकारी राहिलेल्या सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्ताचा टॅक्सीच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बनावट मुद्रांक पेपर (तेलगी) गैरव्यवहारातील तपास अधिकारी राहिलेले सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जावेद (७२) यांचा मंगळवारी रात्री टॅक्सीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टॅक्सी चालक केशव प्रसाद याला अटक करण्यात आली आहे.

जावेद हे साहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले होते. ते पत्नी मुलासह माझगाव परिसरात राहत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ते भाऊचा धक्का येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असताना हा अपघात झाला आहे.

काय होती तेलगी घोटाळा?

अब्दुल करीम तेलगीवर 2001 साली स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा आरोप आहे. या घोटाळ्याने संपूर्ण देश हादरला होता. अब्दुल करीम तेलगीलाही यावर्षी तुरुंगात जावे लागले होते.

2018 मध्ये या प्रकरणात अब्दुल करीम तेलगी आणि इतर सहा साथीदारांना महाराष्ट्राच्या नाशिक सत्र न्यायालयात खटला चालू होता. सर्वांविरुद्ध ठोस पुरावे सापडले होते मात्र, तेलगीचे 2017 मध्येच निधन झाले.

अब्दुल करीम तेलगी हा कर्नाटकातील खानापूर येथील रहिवासी होता. त्याचे वडील भारतीय रेल्वेत नोकरी करत होते. अब्दुल करीम तेलगी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तेलगीला भाजीपाला, फळे, शेंगदाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागला होता.

तेलगीने स्थानिक सर्वोदय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बीकॉमची पदवी घेण्यासाठी तो बेळगावातील एका महाविद्यालयात गेला. यानंतर तो कमाईसाठी मुंबईला आला होता.

मुंबईत काही काळ घालवल्यानंतर अब्दुल करीम तेलगी सौदीला गेला कारण त्याला जास्त पैसे कमवायचे होते. काही वर्षांनी तो पुन्हा मुंबईत आला आणि त्याने स्टॅम्प पेपरचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

हा व्यवसाय कसा सुरू केला?

अब्दुल करीम तेलगी सौदीहून मुंबईला परतल्यावर तो पहिला ट्रॅव्हल एजंट बनला. त्याने अनेक खोटी कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर बनवले, जेणेकरून तो सौदी अरेबियात लोकांना कामासाठी पाठवू शकेल.

1993 मध्ये इमिग्रेशन अथॉरिटीने अब्दुल करीम तेलगीच्या कृतींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी अब्दुल करीम तेलगीला तुरुंगात जावे लागले. त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप होता. यासाठी अब्दुल करीम तेलगी याला दक्षिण मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात हलवण्यात आले.

कोठडीत असताना अब्दुल करीम तेलगीची राम रतन सोनी सोबत ओळख झाली. तो एक सरकारी स्टॅम्प वेंडर होता तो कोलकाताचा होता आणि तो तेथून हे काम हाताळत असे.

या दोघांनी घोटाळ्याचा प्लॅन तुरुंगातच बनवला. सोनीने अब्दुल करीम तेलगीला नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर विकण्यास सांगितले, त्या बदल्यात त्याने कमिशनची मागणी केली. यानंतर स्टॅम्प पेपरचा घोटाळा सुरू झाला.

काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

1994 मध्ये, सोनीसोबत काम करत असताना, अब्दुल करीम तेलगीने सोनीचे संपर्क वापरुन कायदेशीर स्टॅम्प वेंडर बनला. अब्दुल करीम तेलगी आणि सोनी या दोघांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प पेपर तयार करून आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली.

अब्दुल करीम तेलगीने मूळ स्टॅम्प पेपर्स फेक पेपर्समध्ये मिसळण्यास सुरुवात केली. यावर भरघोस नफा मिळू लागला. फेक स्टॅम्प व्यवसायातून भरपूर पैसे कमावले आणि स्वतःचे अनेक साइड बिझनेस सुरू केले.

1995 मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि सोनी वेगळे झाले. यादरम्यान अब्दुल करीम तेलगी पुन्हा एकदा अडचणीत सापडला. मुंबई पोलिसांनी अब्दुल करीम तेलगीविरुद्ध बनावट स्टॅम्प विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

त्याचा परवाना रद्द करण्यात आला, पण अब्दुल करीम तेलगी त्याच्या कामात इतका निष्णात झाला होता की त्यातून कसे बाहेर पडायचे हे त्याला चांगलेच माहीत होते. त्याने स्वतःची प्रेस कंपनी काढली.

सन 1996 मध्ये अब्दुल करीम तेलगीने आपल्या संपर्कातील लोकांना कामावर घेतले आणि मिंट रोड येथे स्वतःची प्रेस कंपनी सुरु केली. त्याने संपर्क वापरून अनेक मशीन्स खरेदी केल्या. ही सर्व यंत्रे जुन्या पद्धतीची होती. हळूहळू त्याचा व्यवसाय इतर शहरांमध्येही पसरू लागला.

अनेकांनी बनावट स्टॅम्प पेपर खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या स्टॅम्प पेपरचा चुकीच्या पद्धतीने मालमत्तेची नोंदणी करण्यासाठीही वापर करण्यात आला. विम्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. 90 च्या दशकात अब्दुल करीम तेलगीचा बिझनेस करोडोंचा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT