admission esakal
महाराष्ट्र बातम्या

‘तंत्रनिकेतन’ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर! 'या' संकेतस्थळावर पाहाता येईल मेरिट लिस्ट; प्रवेशाचे असतील तीन कॅप राउंड; अंतिम यादी २५ जुलैला; ऑप्शन फॉर्मसाठी ३०० महाविद्यालये निवडीची संधी

तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू झाली असून, आज (ता. २०) विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांनी आता इंटरनेट कॅफेत जाऊन स्वत:चा डीईएन (DEN) नंबर व पासवर्ड टाकून लॉगइन करावे. त्यानंतर मेरिट नंबरची प्रिंट घेऊन त्यामधील सर्व माहिती पडताळावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. https://www.poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू झाली असून, आज (ता. २०) विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांनी आता इंटरनेट कॅफेत जाऊन स्वत:चा डीईएन (DEN) नंबर व पासवर्ड टाकून लॉगइन करावे. त्यानंतर मेरिट नंबरची प्रिंट घेऊन त्यामधील सर्व माहिती पडताळावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. https://www.poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करताना भरलेली माहिती अचूक आहे की त्यात काही त्रुटी आहेत, हे पाहून त्यातील दुरुस्ती २१ ते २३ जुलै दरम्यान करायची आहे. जर तात्पुरत्या गुणवत्ता यादीमधील सर्व माहिती बरोबर असेल तर विद्यार्थ्यांना काहीही करावे लागणार नाही. नंतर अंतिम गुणवत्ता यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. त्या दिवशी रात्री आठनंतर नेट कॅफेमध्ये जाऊन पुन्हा एकदा आपल्या गुणवत्ता क्रमांकची प्रिंट घ्यावी. त्यामध्ये नंतर कोणताही बदल करता येणार नाही. २६ ते २९ जुलै या कालावधीत सर्व कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जावे लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. ऑप्शन फॉर्म भरायला जाताना विद्यार्थ्यांनी अर्ज करताना जो मोबाईल नंबर नोंदविलेला आहे, तो सोबत घेऊन जावा लागेल. तसेच विद्यार्थ्यांचा डीईएन नंबर व पासवर्ड देखील सोबत न्यावा लागेल. त्यानुसार त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे.

ऑप्शन फॉर्म म्हणजे काय?

ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमाची यादी तयार करावी. त्यातील पर्याय नीट तपासून घ्यावेत. एखादा चॉईस कोड चुकीचा भरला गेल्यास नको ते महाविद्यालय मिळू शकते. महाविद्यालय निवडताना ते मान्यताप्राप्त असल्याची खातरजमा विद्यार्थ्यांनी करायला हवी. त्याची माहिती वेबसाइटवरही असते. ऑप्शन फॉर्म भरताना अनेक विद्यार्थी अमुकच महाविद्यालयात प्रवेश हवा म्हणून त्याच महाविद्यालयाचे सर्व पर्याय भरतात. आता महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ आणि मग शाखा बदलू, असेही अनेकजण विचार करतात. विद्यार्थ्यांनी हा हट्ट करणे चुकीचे असून, पुढे शाखा बदलून मिळाली नाही, तर नको त्या शाखेतून शिकावे लागेल. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापेक्षा शाखेला महत्त्व द्यावे.

प्रवेशाचे असतील तीन कॅप राउंड

तंत्रनिकेतनच्या प्रवेशाचे अभियांत्रिकीप्रमाणेच साधारणत: तीन टप्पे असतात. पहिल्या दोन टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे असते. विद्यार्थी कमीत कमी एक ते जास्तीत जास्त ३०० महाविद्यालयांचा पर्याय देऊ शकतात. पहिल्या कॅप राउंडमधील प्राधान्यक्रमातील पहिले महाविद्यालय उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या कॅप राउंडमध्ये दिलेल्या प्राधान्यक्रमातील पहिल्या सात महाविद्यालयांपैकी एखादे महाविद्यालय मिळाल्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाचा लागतो. दोन्ही कॅप राउंडनंतर मनासारखे महाविद्यालय उपलब्ध न झाल्यास तिसरा टप्पा रिक्त जागांसाठी घेतला जातो. या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणतेही आरक्षण विचारात घेतले जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT