Taj Hotel Mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

'ताज हॉटेल'मध्ये अतिरेक्यांचा AK-47 रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न?

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : मुंबई येथील ताज हॉटेलच्या (Taj Hotel Mumbai) मागच्या गेटमधून दोन अतिरेकी एके फोर्टी सेव्हन रायफल (AK 47 Rifle) घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती फोनवरून देणाऱ्या अल्पवयीन मुलाची कराड शहर पोलिसांनी नातेवाईकांसह आज सायंकाळी चौकशी केली. यावेळी त्याने गंमत म्हणून हा प्रकार केल्याचे सांगितले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. (Terrorists Try To Enter Taj Hotel Mumbai With AK 47 Rifle Satara Crime News)

कऱ्हाडमधील नववीत शिकणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबईच्या हाॅटेल ताजमधील रिसेप्शन काउंटरला फोन केला.

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे (Karad City Police Station) वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, कऱ्हाडमधील नववीत शिकणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबईच्या हाॅटेल ताजमधील रिसेप्शन काउंटरला (Reception counter) फोन केला. हॉटेलमध्ये फोन उचलल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने ताज हॉटेलच्या पाठीमागील गेटमधून दोन अतिरेकी एके फोर्टी सेव्हन रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखा व बंदोबस्त वाढवावा, असे सांगितले. याबाबतची माहिती कुलाबा पोलिसांनी (colaba police station) त्वरित कराड शहर पोलिसांना दिली. कराड शहर पोलिसांनी ज्या नंबरवरून फोन करण्यात आला, त्या नंबरवरून संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली.

तो फोन यांचा मुलगा वापरत असल्याचे संबंधितांनी सांगितले. मुलगा नववीमध्ये शिकत असून 14 वर्षाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांसमोरच संबंधित मुलाकडे चौकशी केली असता, त्याने गंमत म्हणून फोन केल्याचे स्पष्ट केले. तसेच शुटाऊट वडाला (shout out wadala), 26/11 (26/11 mumbai attack) यासारखे चित्रपट बघितल्याने त्याचा प्रभाव असल्याचेही त्यांने नमूद केले. दरम्यान, प्रथम दर्शनी केलेल्या चौकशीमध्ये संबंधित अल्पवयीन मुलाचा समाज विघातक घटनांशी संबंध असल्याचे दिसून येत नाही. संबंधित मुलाने गंमत म्हणून हा फोन केल्याचे दिसून येत आहे. तरीही याची सखोल चौकशी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Terrorists Try To Enter Taj Hotel Mumbai With AK 47 Rifle Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT