suspect was arrested after 130 km chase sakal
महाराष्ट्र बातम्या

म्हाडा व टिईटी प्रकरण; महत्वाच्या दलालांना सायबर पोलिसांकडून बेड्या

म्हाडा प्रकरणी लातुरमधून दोघांना, तर टिईटीप्रकरणी नाशिक येथून एकास अटक, पोलिसांकडून विविध जिल्ह्यात छापे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : म्हाडा व शिक्षक पात्रता परिक्षा (टिईटी) पेपरफुटी व उमेदवार पात्र करण्याच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने लातूर येथून दोघांना तर नाशिक येथून एकास अशा तीन महत्वाच्या दलालांना ताब्यात घेतले. लातुरमधुन अटक केलेल्या दोघांनीही उमेदवारांकडून कोट्यावधी रुपये जमवून ते हरकळ बंधूंमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचविल्याची माहिती पुढे आली आहे. (TET, Mhada Exam Fraud)

म्हाडाच्या प्रकरणामध्ये जमाल इब्राहिम पठाण (वय 47, रा. जळगपूर, लातुर), कलीम गुलशेर खान (वय 52, रा. बुलढाणा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, टिईटी प्रकरणी मुकुंदा जगन्नाथ सुर्यवंशी (वय 33 , रा. नाशिक) यास पोलिसांनी अटक केली आहे. म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख समवेत अटक केलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी दलालांमार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे व शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्याशी संगनमत करुन गैरव्यवहार केला होता. याच हरकळ बंधुंना पठाण, खान व सुर्यवंशी यांनी कोट्यावधी रुपये दिल्याचे पोलिसांच्या चौकशीत माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. त्यादृष्टीने पोलिसांकडून खान व पठाणचा शोध सुरू होता.

दरम्यान, म्हाडा परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी अटक केलेले खान व पठाण हे दोघेही महत्वाचे दलाल आहेत. त्यांनी उमेदवारांना पात्र करण्यासाठी 80 उमेदवारांकडून प्रत्येकी दिड लाख रुपयांप्रमाणे कोट्यावधी रुपये हरकळला दिले होते. तसेच म्हाडाच्या पेपरफुटीसाठीही त्यांनी 7 ते 8 जणांशी संपर्क साधला होता. तर 2021 च्या टिईटी परीक्षेसाठीही उमेदवारांना पात्र करण्यासाठीची यादी तयार केली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक पठाणच्या शोधासाठी लातूर येथे गेले होते. त्यास ताब्यात घेतल्यानंतर मुळचा बुलढाण्याचा असलेला कलीम खान हा देखील पोलिसांपासून लपण्यासाठी लातुरमध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.

दरम्यान, टीईटीप्रकरणी अटक केलेला सुर्यवंशी हाही या प्रकरणातील महत्वाचा दलाल आहे. त्याने 2018 च्या टिईटी परीक्षेत उमेदवारांना पात्र करण्यासाठी 80 लाख रुपये, तर 2019-20 च्या टिईटीसाठी एक कोटी रुपये हरकळ बंधूंना दिल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. त्यास पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. पठाण, खान व सुर्यवंशी या तिघांबाबतही हरकळ यानेच पोलिसांना माहिती दिली. न्यायालयाने पठाण, खान या दोघांना 24 फेब्रुवारीपर्यंत, तर सुर्यवंशीला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT