Ayodhya Ram Mandir 
महाराष्ट्र बातम्या

BJP News : 'धर्म-देवळे-धार्मिक तणाव' हीच भाजपची त्रिसूत्री...; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबारावर ठाकरे गटाचा मोठा दावा

रोहित कणसे

राज्यात तसेच देशात आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणूकीत विरोधकांची 'इंडिया' आघाडी आणि सत्तेत असलेल्या एनडीएमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

यादरम्यान 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे-धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर या मुद्द्यावर जोरदार निशाणा साधण्यात आली आहे.

जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये गोळीबार याचाच परिणाम...

"देशात असंख्य प्रश्नांचे थैमान सुरू आहे. मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत प्रश्नच प्रश्न दिसत आहेत. त्यावर सरकारकडे कोणताही तोडगा नाही. पालघर येथे जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये एका माथेफिरू जवानाने गोळीबार करून चारजणांचा बळी घेतला. हे त्या धर्मांध अफूच्या सेवनाचेच परिणाम आहेत. हरयाणातही जातीय तणावाचा वणवा पेटवण्यात आला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे-धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल." असा दावा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

"धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळ्या दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून 13 हजार कोटी रुपये खर्च करून देशात 21 भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहेत. मंदिरांचा विकास केला हाच मोदींचा प्रचाराचा मुद्दा राहील. कारण तेच त्यांचे हिंदुत्व आहे."

महाराष्ट्रातही मोठं काम सुरू...

"महाराष्ट्रातसुद्धा मंदिरांवर मोठे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या कॉरिडॉरवर 250 कोटी, तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कॉरिडॉरवर कोटय़वधी खर्च होत आहेत. गुजरातमध्ये अद्भुत द्वारकानगरी उभारणीचे काम सुरू झाले असून त्यावर एक हजार कोटी रुपये खर्च होतील. 138 कोटी खर्च करून द्वारका बेट उभारले जात आहे. 2024 च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिरे तयार होतील." असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

...लोकांना गंगेत वाहत मरावे लागले

"अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते, ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रूपात वावरत होते. थाळय़ा वाजवून, घंटा बडवून कोरोना पळाला नाही. महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे यांच्या कार्यामुळे रोखला. गंगेत माणसांची प्रेते त्या काळात वाहताना जगाने पाहिली. तेथे धर्म होताच, पण विज्ञानाचा वापर झाला नाही व लोकांना गंगेत वाहत मरावे लागले. 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे. 21 मंदिरांचा वापर त्यासाठी होईल. भक्तांनी आता सावध राहावे, इतकेच!" असा इशाार ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT