राज्यात राजकीय वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला आहे. आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाचा समन्स आला आहे. तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी याच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
हेही वाचा- दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
त्याच आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या ट्विटर वार चालू आहे. सुषमा अंधारे आता प्रबोधनकार ठाकरे रॅलीत सभा घेत आहेत. त्या शिंदे गटासह भाजपला चांगलेच धारेवरधरत आहे. चित्रा वाघ यांनी २३ तारखेला एक ट्विट करत सुषमा अंधारे यांना डिवचले होते. त्यांनी ट्विट करत अंधारे यांच नाव घेत ट्विट केलं होतं की, 'माझ नाव घेतल्यावर अधिक प्रसिद्धी मिळते म्हणून अंधारेंसारख्यांची दुकाने चालत असतील, तर माझा काहीच आक्षेप नाही ! फक्त या तथ्यहीन प्रसिद्धीपिपासूंना किती महत्त्व द्यायचं, याचा विचार माध्यमांनी गांभीर्याने करायला हवा !
(thackeray group sushma andhare, chitra wagh)
त्याला उत्तर देण्यासाठी अंधारे यांनी ट्विटला उत्तर ट्विटनेच दिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या" आणि शेवटी लिहिले आहे 'अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय..!!' त्यामुळे आता हा वाद पुन्हा पेटू शकतो.
चित्रा वाघ यांनी तत्कालीन वन मंत्री संजय राठोड यांच्यावर पुजा रोठोड हत्या प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर त्यांना शिंदे- भाजप सरकारमध्ये क्लिनचीट मिळाली आहे. आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे ते मंत्री आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.