uddha thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj statue: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरेंच्या आमदाराची होणार चौकशी; मोठं कारण समोर

MLA Vaibhav Naik will be questioned: वेल्डिंग योग्य न केल्याने, गंज चढल्यामुळे महाराजांचा पुतळा पडला अशी काही तांत्रिक कारणे पुतळा पडण्यामागे असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai: राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. वेल्डिंग योग्य न केल्याने, गंज चढल्यामुळे महाराजांचा पुतळा पडला अशी काही तांत्रिक कारणे पुतळा पडण्यामागे असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.

महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांची पोलीस चौकशी होणार नाही. राजकोटमधील पुतळा कोसळ्याप्रकरणी ही चौकशी आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळा बांधताना घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

वैभव नाईक यांनी त्यांच्याकडील पुरावे सादर करून सहकार्य करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. याचसाठी वैभव नाईक यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हणण्यात आलंय की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. याप्रकरणी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्याकडे भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे तुमच्याकडे असलेले पुरावे आम्हाला देऊन सहकार्य करावे.

समितीच्या अहवालात नेमकं काय?

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला. राज्यातून संतापाची लाट उसळली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु झाला होता. याप्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

समितीच्या अहवालात म्हणण्यात आलंय की, कमकुवत फ्रेम, गंज चढणे आणि चुकीचे वेल्डिंग या कारणांमुळे पुतळा पडला. महाराजांच्या पुतळ्याची देखभाल करणे आवश्यक होतं. पण, यात निष्काळजीपणा झाला. यासंदर्भात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, यावरून आता पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद-प्रतिवाद सुरु होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT