महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde: सुनावणीदरम्यान सिब्बल अडचणीत; युक्तीवादातील तफावत आली समोर

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या युक्तिवादात तफावत समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(supreme court hearing Thackeray group lawyer Kapil Sibal Shiv Sena legislature party leader Eknath Shinde)

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच २०१९ चं मराठी पत्राचं वाचन करण्यात आलं. या पत्रानुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचं सरन्यायाधीशांनी टिपण्णी केली आहे.

..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी कशी निवडणूक झाली याचा ठराव स्वतः सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मराठीतून वाचला. यावेळी, ठराव वाचल्यानंतर धनंजय चंद्रचुड म्हणाले, सिब्बल याच्यावर उद्धव ठाकरेंची सही नाही. याच्यावर ५६ आमदारांची सही आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडण्याचा निर्णय आमदारांनी घेतला. उद्धव ठाकरेंनी नाही.

LIVE Update : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरवात; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

गेले सात महिने, एकनाथ शिंदें यांची गटनेतेपदी उद्धव ठाकरेंनी निवड केली होती असा दावा ठाकरे गट करत आहे. मात्र, आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या टिपण्णीवरुन असे लक्षात येते की, शिंदेंची गटनेतेपदी निवड ५६ आमदारांनी केली आहे.

सिब्बल यांचा नेमंका युक्तीवाद काय?

युक्तीवादा दरम्यान, शिवसेनेची निवडणूक २३ जानेवारी २०१८ मध्ये झाली होती. तर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही २०१८ मध्ये झाली होती. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेत चौथ्या क्रमांकाचे नेते होते. काहींची नेमणूक झाली काही निवडून आले, ही माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. पण घटनाच मान्य नाही असे निवडणूक आयोग आता म्हणतेय, असे बोट सिब्बल यांनी ठेवले.

तसेच २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाकरे मुख्यमंत्री नाही तर पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळाले तरी ते पक्षाचे अध्यक्षच होते. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार देण्यात आले. याच बैठकीत एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड. याच बैठकीत सुनील प्रभुंची प्रतोद म्हणून निवड आमदार पक्षचिन्हाच्या जोरावर निवडून येतात, असे सिब्बल यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT