राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला आला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला असल्याचे सत्ताधारी पक्षातील नेते सांगत आहेत. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडला.
या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार प्रतिक्रिया देत असताना त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले त्यानंतर उद्धव ठाकरे ते पार पडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत होते यावेळी अजित पवारांनी डोळा मिचकावत मागे असलेल्या व्यक्तीला खुणावले आणि हसले हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेते अजित पवार काय म्हणाले.
या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांची सुकाळ असणार हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देण्याचं काम आतमध्ये चाललं होत मात्र पंतप्रधानांच्या हस्ते महाराजांच्या स्मारकांचं भुमीपुजन झालं त्यांच्या संदर्भात किती निधी दिला, किधी काम चालू करणार हे सांगितलं नाही.
या सरकारने राज्यात आठ महिन्यांमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती आज अर्थसंकल्पामध्ये पाहिला मिळाले. हा अर्थसंकल्प विकासाचं पंचामृत आहे. ते कधी दिसणार नाही, फक्त ऐकत राहिचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरऊन आणण्याचा प्रयत्न करायचा २०१४ पासून यांनी केलेल्या घोषणांचं काय झालं अशा प्रश्न देखील अजित पवारांनी उपस्थित केला,
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का, राज्यातून मोठ्या प्रमाणावर उद्योग बाहेर चालले आहेत. ते थांबवण्यासाठी कोणतीही घोषणा नाही, विकास कामांवर निधी खर्च होत नाही, म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले..
उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात कोरोनाचं संकट होतं. या काळात प्रत्येकवेळी केंद्राकडं साधारण २५००० कोटींची जीएसटीची थकबाकी बाकी असायची. आज सकाळीच मी संभाजीनगरमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. अवकाळी पाऊसाचे पंचनामे करायला त्यांच्या बांधावर एकही शेतकरी गेलेला नाही. एकूणच आजचा अर्थसंकल्प म्हणजे सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.