solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

पोरीनं वडिलांचे नाव केले! वडिलांच्या मृत्यूनंतर आजीही गेली, शिक्षणासाठी भाजीपाला विकला, दिव्याखाली अभ्यास करून दहावीत पटकावला पहिला क्रमांक

वडिलांच्या मृत्यूनंतर एक-दीड वर्षात कुटुंबाचा आधार असलेली आजी पण गेली. घरात मोठी मुलगी म्हणून प्रणिती नागनाथ गावडे हीच होती. शिक्षण सोडून लहान बहिण-भावाला साथ द्यायची असा विचार ती करीत होती. पण, तिने दहावीला प्रवेश घेतला आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

तात्या लांडगे

सोलापूर : वडिलांच्या मृत्यूनंतर एक-दीड वर्षात कुटुंबाचा आधार असलेली आजी पण गेली. घरात मोठी मुलगी म्हणून प्रणिती नागनाथ गावडे हीच होती. आता शिक्षण सोडून आपल्या लहान बहिण-भावाला साथ द्यायची असा विचार ती करीत होती. पण, तिने दहावीला प्रवेश घेतला आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावला. ही यशकथा सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील प्रणिती नागनाथ गावडे या मुलीची.

इयत्ता आठवीमध्ये शिकत असताना अचानकपणे वडील नागनाथ गावडे यांचा अपघाती मृत्यू झाला. हसत्या- खेळत्या कुटुंबाला नियतीची नजर लागली. त्या धक्क्यातून सावरून प्रणितीने आजी आधार असल्याने पुढे शिक्षण सुरू ठेवले. अशातच काळाने आणखी एक घाला घातला आणि आजी राजाबाई यांचेही निधन झाले. मुलाच्या निधनानंतर भाजीपाला विकून त्याच्या लेकरांना शिक्षणासाठी पै पै जमविणारी आजीही गेली. कुटुंबात मोठी असलेल्या प्रणितीने शाळा सोडण्याचा विचार केला, पण गावातील समता हायस्कूलमधील शिक्षकांच्या आग्रहानंतर ती पुन्हा शाळेत जाऊ लागली. तिचे वडील नेहमी म्हणायचे ‘माझी राधा एक दिवस माझे नाव नक्की करेल’. त्या वाक्याला सत्यात उतरविण्याचे स्वप्न बघणारी प्रणिती अभ्यास करू लागली. वडिलांची बारावी झालेली, आईची पण जेमतेम सातवीपर्यंतच शाळा झालेली.

लहान बहीण आठवीत तर लहान भाऊ सातवीत आहे. इंग्रजी, गणित अशा अवघड विषयांसाठी तिला शाळेशिवाय कोणाचेही मार्गदर्शन नव्हते. शेतात घर असल्याने बहुधा वीज नसायचीच. घरात टिव्ही नाही, संपर्कासाठी साधा मोबाइल. तिने दिव्याखाली अभ्यास केला आणि आज (सोमवारी) दहावीचा निकाल जाहीर झाला आणि समता हायस्कूलमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला. शिक्षकांनीही तिच्या यशाचे कौतूक केले.

भाजीपाला विकून शिक्षणाला हातभार

शेतकरी कुटुंबातील प्रणिती गावडे हिचे वडील भाजीपाला विकायचे. त्यांच्या मृत्यूनंतर आजी भाजीपाला विकून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायची. मात्र, आजीचेही निधन झाले. घरात लहान बहीण व एक भाऊ आणि स्वत:च्या शिक्षणासाठी काय करायचे, असा प्रश्न होता. अशावेळी तिने स्वत: भाजीपाला विकायला सुरवात केली. सुटी दिवशी भाजीपाला विकून तिनेच कुटुंबाला हातभार लावला. तिच्या काकानेही (जगन्नाथ गावडे) त्यांना मदत केली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या आठवणी मनात ठेवून अभ्यास केला आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT