solapur crime sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात चोरट्यांचे धाडस! बंद घराचा सेफ्टी दरवाजा तोडला अन्‌ कपाट उचकटून 2.05 लाखांचे दागिने चोरले; त्याच परिसरातून 2 दुचाकीही लंपास

नोकरीला गेल्यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने वसंत विहार, गायत्रीनगर भाग-दोन मधील सतीश दिगंबर गव्हाणे यांच्या घरात चोरी केली आहे. याशिवाय नीलेश चंद्रकांत कांबळे व राहुल रमेश मोरे यांच्या घरासमोरील दोन दुचाकी देखील चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पाकणी रेल्वे स्टेशनवर नोकरीला गेल्यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने वसंत विहार, गायत्रीनगर भाग-दोन मधील सतीश दिगंबर गव्हाणे यांच्या घरात चोरी केली आहे. याशिवाय नीलेश चंद्रकांत कांबळे व राहुल रमेश मोरे यांच्या घरासमोरील दोन दुचाकी देखील चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नोकरीवर जाताना गव्हाणे यांनी घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाला बाहेरून कुलूप लावले, तत्पूर्वी आतील दरवाजा देखील बंद केला होता. तरीदेखील चोरट्याने लोखंडी सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून, आतील कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साडेतीन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅमची पिळ्याची अंगठी, दहा भार वजनाचे चांदीचे पैंजण, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, असा एकूण दोन लाख पाच हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचेही पोलिसांना सांगितले.

दुसरीकडे याच भागातील नीलेश कांबळे यांच्या घरासमोरील दुचाकी (एमएच १३, सीए ५००१) व राहुल कोरे यांची दुचाकी (एमएच १३, एटी ९४५१) चोरून नेली आहे. २९ मे रोजी रात्री सात ते ३० मेच्या सकाळी आठपूर्वी ही चोरी झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे तपास करीत आहेत.

भाड्याच्या घरात अजून साहित्य लावणे सुरू असतानाच चोरी

फिर्यादी सतीश गव्हाणे हे काही दिवसांपूर्वीच गायत्री नगर भाग-दोन (बलदवा हॉस्पिटलमागे) येथे भाड्याने राहायला आले होते. अजून घरगुती साहित्य लावायला सुरूच होते. त्याचवेळी चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून डाव साधला. कपाट उचकटून चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे.

परिसरात नाही सीसीटीव्ही

गायत्री भाग-दोन येथे चोरी झाल्याची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे पोलिसांना समजले. दुसरीकडे त्या रात्री कुत्री मोठ्या प्रमाणावर भुंकत असतानाही शेजारील कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही, अशीही माहिती पोलिस सूत्रांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT