mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

‘समाज कल्याण’चा निर्णय! २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; ३० नोव्हेंबरपर्यंत करता येतील ऑफलाइन अर्ज; महाविद्यालयाच्या प्रचार्यांवर ‘ही’ जबाबदारी

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. २०१७ पासून शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बॅंक खात्यात ‘डीबीटी’द्वारे जमा केली जाते. पण, २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले होते.

तात्या लांडगे

सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. २०१७ पासून शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बॅंक खात्यात ‘डीबीटी’द्वारे जमा केली जाते. पण, २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले होते. त्यांना आता शिष्यवृत्ती मिळणार असून त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ऑफलाइन अर्ज करायचे आहेत.

विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नसल्याने, सर्व्हरला तांत्रिक अडचणी किंवा उत्पन्न मर्यादा व जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने अनेकांना अर्ज करता आले नाहीत. तसेच महाविद्यालयांकडून शुल्क निश्चिती वेळेत न झाल्याने किंवा नियमित, पुरवणी परीक्षांचे निकालास विलंब झाल्याने अनेकांचे अर्ज ‘महाडीबीटी’वर नामंजूर झाले. अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून समाज कल्याण विभागाने त्यांना एक संधी दिली आहे. त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत ३० नोव्हेंबरपर्यंत सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात ऑफलाइन अर्ज जमा करायचे आहेत. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ असणार नाही. सहायक समाज कल्याण कार्यालयाकडे जमा झालेल्या अर्जांची पडताळणी होऊन ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत समाज कल्याण आयुक्तांकडे पाठविले जाणार आहेत.

महाविद्यालयाच्या प्रचार्यांवर ‘ही’ जबाबदारी

ऑफलाइन मान्यतेसाठी प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्याची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहणार आहे. त्या विद्यार्थ्याने यापूर्वी पण अर्ज करून शिष्यवृत्ती किंवा फ्रिशिप घेतली नसल्याची खात्री त्यांनी करायची आहे. तरीपण, एखाद्याने असा गैरप्रकार केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्यांवर असेल, असेही सहायक समाज कल्याण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदतीत अर्ज करावेत

२०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षात शिष्यवृत्तीसाठी अर्ज करूनही ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यांना पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. महाविद्यालयांच्या माध्यमातून त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. या कालावधीतील विद्यार्थ्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदतीत अर्ज करावेत.

- सुलोचना महाडिक, सहायक समाजकल्याण आयुक्त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT