solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाचा निर्णय! प्रथम वर्ष वगळता सर्वांचीच आता सरमिसळ पद्धतीने परीक्षा; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्हीचे बंधन; सरमिसळ पद्धत म्हणजे काय?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पहिल्या सत्राची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरवातीला पारंपारिक अभ्यासक्रमांची तर परीक्षा सुरू होईल आणि त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची व शेवटी अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पहिल्या सत्राची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरवातीला पारंपारिक अभ्यासक्रमांची तर परीक्षा सुरू होईल आणि त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची व शेवटी अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात तर द्वितीय वर्षांपासून पुढील वर्गांची परीक्षा सरमिसळ पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यावर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे.

विद्यापीठातील विविध संकुलांसह संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात होणार आहे. परीक्षेसाठी ३० ते ७० केंद्रे असणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यापीठाकडून भरारी पथके नेमली जाणार असून विद्यापीठाचे अधिकारी परीक्षा काळात अचानकपणे केंद्रांना भेटी देतील.

विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पाठविल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रश्नपत्रिका ज्याठिकाणी प्रिंट काढतात, त्याठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. विद्यापीठातर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे, पण परीक्षा पद्धत पूर्वीप्रमाणेच असणार आहे. परीक्षा तीन सत्रात असणार असून दररोज विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे तीन सत्रात पेपर घेतले जाणार आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत परीक्षा संपविण्याचे नियोजन

विद्यापीठाचे कुलगुरू, प्र कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालू शैक्षणिक वर्षातील विद्यापीठाच्या पहिल्या सत्राची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून घेण्याचे नियोजित आहे. सुरवातीला पारंपारिक, त्यानंतर व्यावसायिक व शेवटी अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या परीक्षा होतील. डिसेंबरपर्यंत सर्व परीक्षा संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सरमिसळ पद्धत म्हणजे काय?

पुणे बोर्डाने दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत लागू केली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही बंधन घालण्यात आले आहे. तीन किलोमीटर अंतरावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या परिसरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात परीक्षा द्यावी लागते. एकाच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच केंद्रावर परीक्षेसाठी असल्यास एकमेकांचे पाहून उत्तरे लिहू शकतात, हा गैरप्रकार टाळण्यासाठी पुणे बोर्डाने सरमिसळ पद्धत सुरू केली. अशीच पद्धत आता विद्यापीठाच्या परीक्षेतही दिसणार आहे. पण, ही पद्धत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी लागू नसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर

TRAI Regulations : मोठी खबर! १ जानेवारीपासून TRAI लागू करणार नवा नियम; कंपन्यांचा फायदा अन् ग्राहकांचा तोटा?

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

SCROLL FOR NEXT