sakal breaking Esakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्ह्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक लांबली! जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्र. एकसह २९ संस्थांची होणार निवडणूक

सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक थांबविण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्र. एक यासह २९ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे इथपर्यंत आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया मतदार यादीपर्यंत आहे, त्यांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश निघाले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक थांबविण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्र. एक यासह २९ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे इथपर्यंत आली आहे.

  • सोलापूर शहरातील दि. सोलापूर सोशल अर्बन को-ऑप. बॅक लि., विद्यानंद को-ऑप. बॅंक. लि., श्री. सिद्धेश्वर सहकारी ग्राहक भांडार लि. कुमठे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय कर्मचारी व परिचारिकांची सहकारी पतसंस्था क्र.एक, सोलापूर जिल्हा पोलिस कर्मचारी सहकारी पतसंस्था, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सेवकांची सहकारी पतसंस्था, एसटी एम्प्लाईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मौलाना आझाद प्राथमिक उर्दु शिक्षक सहकारी पतसंस्था

  • माळशिरस तालुक्यातील श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था, सदाशिवनगर, शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित माळीनगर, माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. माळशिरस, सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था, शंकरनगर, श्री. शिवशंकर वीज कामगार सहकारी पतसंस्था, अकलूज व दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. नोकरवर्ग सहकारी पतपेढी, माळीनगर.

  • माढा तालुक्यातील रणदिवेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, रणदिवेवाडी, लोंढेवाडी, खैराव, तांबवे यासह बबनराव शिंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निमगाव (टें), वडाचीवाडी (उ.बु.), कुंभेज, परितेवाडी, गवळेवाडी, पिंपळखुटेसह श्री स्वामी समर्थ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हैसगाव.

  • बार्शीतील बार्शी तालुका उद्योग विकास को-ऑप सोसायटी.

  • करमाळ्यातील करमाळा तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था, देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप सहकारी रुग्णालय आणि रिसर्च सेंटर, करमाळा, दक्षिण सोलापुरातील रे नगर हौसिंग को-ऑप. सोसायटी फेडरेशन

  • मंगळवेढ्यातील बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, नवरत्न औद्योगिक सहकारी संस्था.

  • पंढरपुरातील करकंब नं.चार, त. शेटफळ, उंबरगाव, बोहाळी-उंबरगाव, उपरी आणि वसंतराव काळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पटवर्धनकुरोली व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था, चंद्रभागा नगर या संस्थांची निवडणूक लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Solapur South Assembly Election Result 2024 : आघाडीतील बिघाडी ठरली ‘दक्षिण’च्या यशाची गुरूकिल्ली

MLA Chetan Tupe Patil : हडपसर विधानसभा नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे पाटील विकासाचे ‘रोल मॉडेल’ पुढे आणणार

Vijay Rashmika Viral Photos : विजय-रश्मिकाच्या रिलेशनशिपचे गुपित उघड? रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र जेवताना दिसले

SCROLL FOR NEXT