Maharashtra Legislative Assembly  File Photo
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त नव्हे तर होणार खुल्या पद्धतीने

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही निवडणूक खुल्या पद्धतीने होणार आहे. विधीमंडळ विषयनियामक समितीकडून हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत ही निवडणूक गुप्त पद्धतीने न होता खुल्या पद्धतीने घेण्याचा ठराव झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचे नियम विधानसभेच्या विषय नियामक समितीत बदलले होते. आज बुधवारी (ता.२२) होणाऱ्या बैठकीत ते मंजुरीसाठी मांडण्यात येणार होते. जुन्या नियमांनुसार विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी अधिवेशन कार्यकाळात ४८ तासांची सूचना आवश्यक होती. विषयनियामक समितीने त्यात बदल केला आहे. भाजपचे आमदार निलंबित केल्यानंतर लगेचच नियामक समितीच्या बैठकीत हा नियम बदलण्यात आला होता.

नियामक समितीत महाविकास आघाडीचे बहुमत आहे. तसेच भाजपचे या समितीत असलेले सदस्य निलंबित आहेत. राज्यसभेची जागा काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र मतदानाची वेळ आल्यास सर्व आमदार हजर होतील. त्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबद्दल विचार सुरु आहे.

नियम बदल विधानसभेत मांडल्यानंतर ते मंजूर झाले तरी दहा दिवसांनंतर प्रत्यक्षात येतात. मात्र, विधानसभेत हा नियम बदलण्यासाठी ठराव करण्याची सोय आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचे पद रिक्त आहे. भाजपचे १२ सदस्य निलंबित झाले असल्याने निवडणूक जिंकणे सहजशक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT