Flood Esakal
महाराष्ट्र बातम्या

महापुरामुळे "या' जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

महापुरामुळे "या' जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

तात्या लांडगे

पावसामुळे चिपळूण पाण्याखाली गेले असून रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेत 35 जणांचा बळी गेला आहे.

सोलापूर : कोकणातील (Konkan) पाच जिल्ह्यांसह पश्‍चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) कोल्हापूर (Kolhapur), पुणे (Pune), सांगली (Sangli) आणि विदर्भ (Vidarbh), मराठवाड्यातील अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मागील चार दिवसांत 65 मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील शेतीपिकांना विशेषत: फळबागांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने मदत द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने आज पाठविला आहे. (The floods have caused severe damage to crops in many districts of the state-ssd73)

पावसामुळे चिपळूण पाण्याखाली गेले असून रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेत 35 जणांचा बळी गेला आहे. सांगली व कोल्हापुरातील (Kolhapur) पुरात (Flood) अडकलेल्यांना वाचविण्यासाठी आर्मीच्या (Army) दोन तुकड्या (100 जवान) पाठविण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफच्या 18 तर एसडीआरएफच्या चार आणि नौदलाच्या चार तुकड्यांची मदत घेतली जात आहे. पावसामुळे अनेकांचा संसार पाण्याखाली आहे, तर काहींचा संसार पाण्यात वाहून गेला आहे. पावसाचा फटका बसलेल्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारनेही पूरग्रस्तांना तातडीची भरपाई म्हणून साधारणपणे दोन ते अडीच हजार कोटींपर्यंत मदत द्यावी, अशी मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातही मागील चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा आढावा घेणे सुरू झाले आहे.

राज्यातील कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांसह पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भ- मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर एनडीआरएफमधून केंद्र सरकारकडे मदत मागितली जाणार आहे.

- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

राज्यभर मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: राज्यातील 13 जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार पावसामुळे राज्यातील अंदाजित पावणेदोन लाख हेक्‍टरवरील शेतीपिकांचे जवळपास 12 हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. अमरावती (Amravati), वाशिम (Washim), ठाणे (Thane), रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar), रायगड (Raigad), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील पिकांना मोठा फटका बसला असून अनेकांची शेती वाहून गेली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार दोन दिवसांत महसूल व कृषी विभागाला शेती नुकसानीचा अहवाल द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT