पहिल्या टप्प्यात अंदाजित एक लाख 60 हजार रुग्णांसाठी निधीची तरतूद केली जाणार आहे.
सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख 41 हजार 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या मृत रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (State Disaster Response Fund) प्रत्येकी 50 हजारांची मदत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजित एक लाख 60 हजार रुग्णांसाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने (Relief and Rehabilitation Department) वित्त विभागाकडे (Department of Finance) आठशे कोटींची मागणी केली आहे. जानेवारी 2022 मध्ये प्रत्येकास ही मदत वितरीत केली जाणार आहे. (The heirs of those who passed away of corona will receive help in January)
देशावरील कोरोनाच्या संकटात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना मदत करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार प्रत्येक मृताच्या वारसांना 50 हजार रुपये देण्याची भूमिका केंद्र सरकारने मान्य केली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत वितरीत केली जाणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा (Central Government) 75 टक्के तर राज्य सरकारचा (State Government) 25 टक्के हिस्सा आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईत होणार आहे. त्यामध्ये आठशे कोटींची तरतूद केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक अर्जदाराच्या बॅंक खात्यात थेट ही रक्कम वितरीत होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. अर्ज करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले असून त्यावर आतापर्यंत 77 हजारांपर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत.
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 47 हजार 653 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे नागपूर (Nagpur), नगर Nagar), नाशिक (Nashik), सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara) या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. हिंगोली (Hingoli), बुलढाणा (Buldhana), गोंदिया (गोंदिया) व गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, कोरोना रिपोर्टनुसार तीन हजार 679 रुग्णांचा इतर कारणांमुळे मृत्यू, अशी नोंद असल्याने त्यांच्या वारसांना मदत मिळणार की नाही, यासंदर्भातही संभ्रम आहे. दुसरीकडे, म्युकरमायकोसिस (Mucormycosis) होऊन मृत्यू झालेल्यांना विशेषत: कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस होऊन मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी 50 हजारांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत जवळपास 76 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
- संजय धारुरकर (Sanjay Dharurkar), उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई
मदत निधीची सद्य:स्थिती
अंदाजित लाभार्थी : 1.60 लाख
मदतीसाठी तरतूद : 800 कोटी
आतापर्यंतचे ऑनलाइन अर्जदार : 76,400
अजूनही अर्ज न केलेले : 64,823
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.