मुंबई : राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढलक असून आतापर्यंत एकुण 65 रुग्णांची नोंद राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
बुधवारी आयजीआयबी प्रयोगशाळेने आणखी 20 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद केली. त्यामुळे, ही संख्या 65 वर पोहोचली आहे.
आज सापडलेले रुग्ण
मुंबई 7
पुणे - 3
नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर- प्रत्येकी 2
चंद्रपूर , अकोला - प्रत्येकी 1
जिल्हा : डेल्टा प्लस व्हेरिएंट एकूण रुग्ण
जळगाव 13
रत्नागिरी 12
मुंबई 11
ठाणे 06
पुणे 06
नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर- प्रत्येकी 2
पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड प्रत्येकी 1
एकूण 65
आता पर्यंत राज्यात आढळलेल्या 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत.
सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 ते 45 वर्ष वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्ष वयोगटातील 17 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून
60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.
65 रुग्णांपैकी 34 रुग्णांची माहिती राज्य सरकारला मिळाली असून रत्नागिरीतील एक मृत्यु वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सेंटीनल सर्वेक्षण राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवडयाला 15 प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते.
जनुकीय क्रमनिर्धारणासाठी सी. एस. आय. आर. सोबत समन्वय महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी यासाठी कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थे अंतर्गत काम करणा-या इन्स्टिटयुट ऑफ जिनोमिक्स अॅड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.