solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिसांना सापडेना हातभट्टी दारु निर्मिती अन्‌ विक्रीचे मूळ! ‘ऑपरेशन परिवर्तन’ गुंडाळल्याचे चित्र; राज्य उत्पादन शुल्क विभाग शांत, गावागावात हातभट्टी विक्री जोमात

तात्या लांडगे

सोलापूर : दक्षिण सोलापुरातील ११, उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यातील प्रत्येकी नऊ, अक्कलकोट तालुक्यातील सहा, करमाळा तालुक्यातील सात, अशा एकूण ५४ गावांच्या शिवारात अवैधरीत्या हातभट्टीची निर्मिती होते, असे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले आहे. हातभट्टी निर्मितीची गावे तथा तांडे आणि ती दारू अवैधरीत्या विक्री होणाऱ्या गावांचीही यादी राज्य उत्पादन शुल्क व ग्रामीण पोलिसांकडे आहे. तरीदेखील, साधारणत: २० वर्षांनंतरही जिल्हा अद्याप हातभट्टीमुक्त झालेला नाही, हे विशेष.

जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यामधील बहुतेक गावांमध्ये बिनधास्तपणे हातभट्टी विक्री होत असल्याची स्थिती आहे. अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी स्थानिक पोलिसांना त्यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही त्या गावांमधील अवैध हातभट्टी विक्री बंद झालेली नाही. पण, मुळात ही हातभट्टी तयार करणारे लोक, पोलिसांना गुंगारा देऊन त्याची अवैधरीत्या वाहतूक करणारे लोक कोण आहेत, याचा शोध ना पोलिसांना ना राज्य उत्पादन शुल्क विभागाला घेता आला.

आजही गावागावांतील अनेक तरुण, युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असून, अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. गावागावांत सहजपणे हातभट्टी उपलब्ध होत असल्याने कौटुंबिक वाद देखील वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टीमुक्त गाव अशा मोहिमा सुरू असतानाही या यंत्रणांना हातभट्टी बंद करण्याचा कायमचा ना उपाय सापडला ना त्याचे मूळ सापडले, अशीच वस्तुस्थिती आहे.

पोलिसांच्या यादीत जिल्ह्यातील ‘ही’ ५४ गावे

दक्षिण सोलापुरातील मुळेगाव, तिल्लेहाळ, दोड्डी, उळेवाडी, गुरप्पा, वडजी, शिवापुढारी, सीताराम तांड्यासह बक्षिहिप्परगा व वरळेगाव येथे हातभट्टी तयार केली जाते. उत्तर सोलापुरातील कोंडी, गुळवंची, तिऱ्हे, सेवालाल, कवठे, भोजप्पा, घोडा तांडा, खेड, शिवाजीनगर, अक्कलकोटमधील कलकर्जाळ, कोर्सेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा, बार्शीतील भातंबरे तांडा, पंढरपुरातील देगाव, लक्ष्मी टाकळी, वाखरी, करमाळ्यातील सर्पडोह, करमाळा, भाळवणी, जिंती- पारेवाडी, हिंगणी, वांगी, केत्तूर येथेही हातभट्टी तयार केली जाते. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर, भांबेवाडी, माळशिरसमधील कुरभावी, गुरसाळे, धर्मपुरी, चांदापुरी, चंद्रपुरी, विजोरी, चव्हाणवाडी, सवतगव्हाण, पारधी वस्ती, पिलीव यासह सांगोल्यातील पाचेगाव खु., हातीद, वाकीशिवणे, महीम, चिकमहूद, महूद येथेही अवैधरीत्या हातभट्टी तयार होत असल्याची माहिती पोलिसांनी यापूर्वीच संकलित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation बाबत सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

Hyundai Motor IPO: सणासुदीत कमाईची मोठी संधी! देशातील सर्वात मोठा IPO दिवाळीपूर्वी येणार

Teerth Darshan Yojana : तीर्थदर्शन योजनेसाठी आले दोन हजार अर्ज; अयोध्या, बुद्धगया, केदारनाथला जाणारे सर्वाधिक

Nashik News: टायटल क्लिअर नसताना घरे फ्री होल्ड कशी? सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीचा सवाल, निवडणूक ‘स्टंट’चा आरोप

Latest Marathi News Updates : तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT