mpsc sakal
महाराष्ट्र बातम्या

ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला

ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला

तात्या लांडगे

नव्या वेळापत्रकाची घोषणा नुकतीच झाली असून आता ही परीक्षा 23 जानेवारीला होणार आहे.

सोलापूर : नववर्षात 2 जानेवारीला होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा (Pre-examination of State Service) पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना (Covid-19) काळात वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे गेली होती. नव्या वेळापत्रकाची घोषणा नुकतीच झाली असून आता ही परीक्षा 23 जानेवारीला होणार आहे. (The pre-examination for state service will be held on January 23)

कोरोनामुळे मागील दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेता आल्या नाहीत. राज्य सरकारकडूनही (Maharashtra State Government) आयोगाला वेळेत मागणीपत्र सादर करता आले नाही. दरम्यान, आयोगाने या वर्षी होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग सध्या वाढू लागला असून काही दिवसांत कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांवर पोहचली आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनचा (Omicron) विळखाही घट्ट होऊ लागला आहे. त्यामुळे आयोगाने नियोजित परीक्षा 30 जानेवारीपूर्वी उरकण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, अडीच लाख उमेदवारांची राज्य सेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारीला घेण्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोगाबद्दल माहिती घेतली जाणार आहे. त्यासंदर्भातील माहिती आयोगाकडून त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

750 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन

राज्यातील अडीच लाख उमेदवार राज्य सेवेची पूर्व परीक्षा देणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर काही केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राज्यभरात परीक्षेची 750 केंद्रे (Exam Centers) असतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षेला विलंब झाल्यास पुन्हा काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, अशी भीती होती. त्यामुळे आता ही परीक्षा 23 जानेवारीला होणार आहे.

ठळक बाबी...

  • वयोमर्यादा संपलेल्या जवळपास सहाशे उमेदवारांनी केले राज्य सेवेसाठी अर्ज

  • जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचे राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज

  • राज्य सेवेची पूर्व परीक्षा 23 जानेवारीला तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 29 जानेवारीला होणार

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन, पोलिस उपनिरीक्षक ही परीक्षा 30 जानेवारीला होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT