Schedule Will Announced on8th Feb for Pre-Examination of State Service-MPSC Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यसेवेची पूर्वपरीक्षा फेब्रुवारीत? 'या' दिवशी येणार वेळापत्रक

राज्यसेवेची पूर्वपरीक्षा फेब्रुवारीत? 8 जानेवारीपर्यंत होणार वेळापत्रक जाहीर

तात्या लांडगे

नव्या वेळापत्रकाची घोषणा या आठवड्यात होईल, अशी माहिती 'एमपीएससी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापूर : नववर्षात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (State Service Pre-Examination) पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना (Covid-19) काळात वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे 2 जानेवारीला होणारी ही परीक्षा आता कधी होणार, याची उत्सुकता अडीच लाख उमेदवारांना लागली आहे. नव्या वेळापत्रकाची घोषणा या आठवड्यात होईल, अशी माहिती 'एमपीएससी'च्या (MPSC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. (Schedule Will Announced for Pre-Examination of State Service)

कोरोनामुळे मागील दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (Maharashtra Public Service Commission) त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेता आल्या नाहीत. राज्य सरकारकडूनही (Maharashtra State Government) आयोगाला वेळेत मागणीपत्र सादर करता आले नाही. दरम्यान, आयोगाने या वर्षी होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग सध्या वाढू लागला असून काही दिवसांत कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांवर पोचली आहे. दुसरीकडे, ओमिक्रॉनचा (Omicron) विळखाही घट्ट होऊ लागला आहे. त्यामुळे आयोगाच्या नियोजित संभाव्य वेळापत्रकानुसार परीक्षा होतील की नाही याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, अडीच लाख उमेदवारांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा फेब्रुवारीत होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु, वेळापत्रक निश्‍चित करताना पुन्हा ते पुढे जाणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.

750 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन

राज्यातील अडीच लाख उमेदवार राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर काही केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राज्यभरात परीक्षेची 750 केंद्रे (Exam Centers) असतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हजारो विद्यार्थी म्हणतात, परीक्षेला विलंब नको. परीक्षेला विलंब झाल्यास पुन्हा काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून आयोगाकडून ही परीक्षा वेळेतच व्हावी, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

ठळक बाबी...

  • कोरोनामुळे ज्यांची वयोमर्यादा संपली, त्यांना दिली होती अर्ज करण्याची संधी

  • 1 जानेवारीला त्यांना दिलेली मुदत संपली; जवळपास सहाशे उमेदवारांनी केले अर्ज

  • इतर परीक्षांचे वेळापत्रक पाहून ठरणार राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख

  • सोमवार ते शुक्रवार (3 ते 7 जानेवारीदरम्यान) घोषित होणार नवे वेळापत्रक

  • विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी दिला जाणार काही दिवसांचा अवधी; संभाव्य कोरोना संसर्ग वाढीचाही होईल विचार

  • जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT