maharashtra farmer suside maharashtra
महाराष्ट्र बातम्या

कृषीप्रधान महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव! 9 जिल्ह्यात 2 दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या; 517 दिवसांत 3900 आत्महत्या; मदतीसाठी कुटुंबियांचे हेलपाटे

जगाचा पोशिंदाच सध्या अडचणीच्या चक्रव्युहात अडकला असून जानेवारी २०२३ ते मे २०२४ या काळात राज्यातील तब्बल तीन हजार ९०० शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जगाचा निरोप घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जगाचा पोशिंदाच सध्या अडचणीच्या चक्रव्युहात अडकला असून जानेवारी २०२३ ते मे २०२४ या काळात राज्यातील तब्बल तीन हजार ९०० शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जगाचा निरोप घेतला आहे. त्यात यवतमाळ, अमरावती, बीड, बुलढाणा, अकोला, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव व धाराशिव या नऊ जिल्ह्यांमध्ये दररोज एक किंवा दोन दिवसातून किमान एक शेतकरी आत्महत्या करतोच, अशी धक्कादायक स्थिती आहे.

कोकण विभाग शेतकरी आत्महत्यामुक्त झाला असून सांगली, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, हिंगोली, नागपूर, भंडारा, नगर, धुळे व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. पण, शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. राज्यात दररोज सात ते आठ शेतकरी आत्महत्या होतात, अशी राज्यातील धक्कादायक वस्तुस्थिती आहे. जालना, परभणी, लार, वाशिम, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्येही शेतकरी आत्महत्या लक्षणीय आहेत.

नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ आणि बॅंका व खासगी सावकारांचा डोक्यावरील वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे आत्महत्या वाढत असल्याची स्थिती आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाकडून एक लाखांची मदत मिळते, पण त्यासाठी ढीगभर कागदपत्रे देऊनही हेलपाटे मारावे लागतात. १६ महिन्यांतील एकूण शेतकरी आत्महत्या झालेल्यांपैकी साडेबाराशे कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नाही, अशीही स्थिती मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून दिसून येते.

दुष्काळात १७७६ शेतकऱ्यांनी घेतला जगाचा निरोप

ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यापासून राज्यातील एक हजार ७७६ शेतकऱ्यांनी (१ ऑक्टोबर २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत) आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारीपणा, बॅंका व खासगी सावकारांचा कर्जासाठी तगादा, नापिकी, दुष्काळ अशा प्रमुख कारणांमुळे आत्महत्या वाढल्याची स्थिती आहे. त्यात अमरावती व छत्रपती संभाजीनगर या विभागांमधील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, बीड, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद आहे.

सर्वाधिक आत्महत्येचे जिल्हे

(१ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२४)

  • जिल्हा एकूण आत्महत्या

  • अमरावती ४३४

  • यवतमाळ ४१०

  • बीड ३२८

  • बुलढाणा ३१०

  • छ.संभाजी नगर २२६

  • अकोला २१६

  • नांदेड २१६

  • धराशिव २१३

  • जळगाव २१३

  • एकूण २,५६६

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मदतीची स्थिती

  • १६ महिन्यातील आत्महत्या

  • ३,६८९

  • अपात्र प्रस्ताव

  • ८०८

  • चौकशी प्रलंबित

  • १,१५९

  • मदत मिळालेली कुटुंबे

  • १,५९८

  • मदतीच्या प्रतीक्षेतील प्रस्ताव

  • १०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT