निधी वितरीत करण्याचे आदेश ग्रंथालय संचालनालयास देण्यात आले आहेत.
सोलापूर : राज्यातील 12 हजार 149 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या (Public libraries) थकीत अनुदानापोटी 36 कोटी 75 लाख 37 हजार 500 रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निधी वितरीत करण्याचे आदेश ग्रंथालय संचालनालयास (Directorate of Libraries) देण्यात आले आहेत. गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय झाल्याचा अद्यादेशही निघाला आहे. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना परिरक्षण अनुदान देण्यासाठी 2021-22- मध्ये अर्थसंकल्पात 122 कोटी 51 लाख 25 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीत रकमेच्या 30 टक्के रक्कम म्हणजे 36 कोटी 75 लाख 37 हजार 500 रुपये वितरीत करण्यास महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) मान्यता दिली आहे. याबद्दलचे ट्विट उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher Education Minister Uday Samant) यांनी नुकतेच केले आहे. (The state government sanctioned Rs 37 crore for the grant of public libraries-ssd73)
राज्यातील 12 हजार 149 ग्रंथालयांचे 2020-21 या वर्षातील थकीत अनुदान रुपये 47 कोटी मिळवण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ (Maharashtra Public Library Staff Union), पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व शिष्टमंडळाने पाठपुरावा केला होता. मागील सप्टेंबर महिन्यापासून अनुदान रखडले होते. कोरोनाच्या (Covid-19) लॉकडाउनमुळे (Lockdown) ग्रंथालये उघडण्यास निर्बंध असल्याने या कालावधीत वाचक वर्गणीच्या रूपाने मिळणारी रक्कमही ग्रंथालयांना मिळत नव्हती. यामुळे ग्रंथालये चालवणे कठीण झाले होते. इमारत भाडे, वीजबिल, पुस्तक खरेदी ही कामे निधीअभावी रखडली होती.
आकडे बोलतात
अर्थसंकल्पीय तरतूद : 122 कोटी 51 लाख 25 हजार
मंजूर अनुदान : 36 कोटी 75 लाख 37 हजार 500
न देता आलेले अनुदान : 46 कोटी 34 लाख
राज्यातील एकूण ग्रंथालये : 12 हजार 149
राज्यातील एकूण ग्रंथालयीन कर्मचारी : 21 हजार 615
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ग्रंथालये : 947
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ग्रंथालयीन कर्मचारी : 2100
मार्च महिन्यात ही रक्कम मिळणे अपेक्षित होते. ऑगस्टमध्ये दुसरा हप्ता येत असतो. दुसरा हप्ता तरी शासनाने वेळेवर देऊन ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांचे संघटनेकडून आभार.
- सदाशिव बेडगे, अध्यक्ष, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ, पुणे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.