pune terrorist sakal
महाराष्ट्र बातम्या

ATS Maharashtra:महाराष्ट्रात पकडलेले दहशतवादी ११ ऑगस्टपर्यंत एटीएसच्या कोठडीत, या प्रकरणाशी संबंधीत सहाव्या संशयिताला अटक

ISIS Module :महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चारही जणांना ११ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ISIS Module :महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चारही जणांना ११ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील दोन जणांना पुणे एटीएसने कोथरुडमधून अटक करण्यात आली होती. या चौघांचाही कुख्यात दहशतवादी संघटना ISISशी संबंध असल्याची बाब समोर येत आहे.

या दहशतवादी संघटनेचे धागेदोरे देशभरात पसरलेले आहेत. पुण्यातून अटक केलेल्या मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस साकी यांचं शिक्षण कमी झालंय,पण त्यांना इतरांकडून तांत्रिक मदत मिळत होती.

झुल्फिकार अली बडोदावाला हा त्यांना पैश्यांबरोबचं तांत्रिक मदतही पुरवत होता. चौथा आरोपी सीमाब काझी हा देखील आयटी इंजिनिअर आहे. या चौघांकडून विस्फोटक बनवण्याचे प्रयत्नही सुरु होते. त्यांना बाकीच्या सहकाऱ्यांकडून तांत्रिक माहिती मिळत होती, त्याचबरोबर ते वेब सिरिज आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून विस्फोटक बनवण्याची माहिती मिळवत होते.(Latest Marath News)

पुण्यातून ज्या दोघांना अटक करण्यात आली होती, त्यांच्या फ्लॅटवर पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला होता, प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर हा पदार्थ विस्फोटक असल्याची माहिती मिळाली. यावरुन त्यांचा मोठा घातपात करण्याचा मानस असल्याचं स्पष्ट होत आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्ट पर्यंत एटीएसच्या कोठडीत पाठवले आहे.

महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकून ४ लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी, इमरान खान आणि युनूस साकी यांना कोथरुडमधून, सीमाब काझी याला रत्नागिरीमधून आणि अब्दुल पठाण याला गोंदियामधून अटक करण्यात आली होती. हे चौघे एकमेकांच्या संपर्कात होते आणि ते वेगवेगळी नावे वापरुन इतरांशी संपर्क करत होते, या गोष्टी तपासातून समोर आल्या आहेत.Latest Marath News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT