Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: पवारांची भाकरी सोलापूरात करपली? भालकेंची नाराजी राष्ट्रवादीला पडणार महागात?

रोहित हरिप

रोहित हरिप - राजीनामा नाट्यानंतर शरद पवारांनी पक्षविस्तारासाठी पुन्हा एकदा कंबर कसलेली असताना राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सोलापूरातच पवारांना दणका बसला आहे. राष्ट्रवादीचा दिग्गज नेता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर आहे.

सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. मोहिते,जगताप, पाटील, शिंदे, भालके अशी मातब्बर घराणांच्या जोरावर राष्ट्रवादी या जिल्हात पसरला पण २०१९ पासून पक्षाला गळती लागत गेली. आता हा जिल्हा भाजपच्या ताब्यात आहे. (Latest Marathi News)

जिल्हातल्या ११ मतदारसंघापैकी राष्ट्रवादीकडे फक्त आज २ आमदार आहेत. पंढरपूरची भालकेंची जागासुध्दा राष्ट्रवादीला पोटनिवडणूकीत गमवावी लागली.(Marathi Tajya Batmya)

राजीनामा नाट्यानंतर शरद पवारांनी त्यांचा पहिला मोर्चा वळवला तो सोलापूर जिल्हाकडे. या जिल्हात पवारांनी भाकरी तर फिरवली पण कदाचित भाकरी फिरवायला उशीर झाला असावा.

कारण शरद पवारांनी पंढरपूरातून साखर कारखाना सम्राट अभिजित पाटलांना आमदारकी घोषीत करुन टाकली. राष्ट्रवादीतले प्रस्थापित अस्वस्थ झाले. यातला पहिला नंबर होता तो भगिरथ भालके यांचा.(Latest Marathi News)

पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर भगिरथ भालके हे राजकीय आस्तिवासाठी झगडत असताना आता अभिजीत पाटलांच्या आमदारकीच्या उमेदवारीमुळे पंढरपूरातून पण भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.(Marathi Tajya Batmya)

भगिरथ भालके हे २०२४ ची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत पण सध्या समाधान आवताडे भाजपचे आमदार असल्यामुळे भाजपची दारं भेलकेंसाठी सध्या तरी बंद आहेत त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार भालके हे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे.चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्राबाहेर करत आहेत. महाराष्ट्रावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे.पंढरपूर मतदारसंघात भगिरथ भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा एक लाख पाच हजार मतं त्यांना मिळाली होती.(Marathi Tajya Batmya)

त्यामुळे भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडली, तर राष्ट्रवादीसाठी पंढरपुरात हा मोठा धक्का असेल. याआधी सोलापूरातून मोहीते पाटलांसारख्या दिग्गज घराण्याने राष्ट्रवादीची साथ सोडली होती त्याचा परिणाम २०१९ च्या निवडणूकांमध्ये दिसला होता. तेव्हा पंढरपूरात शरद पवारांनी भाकरी फिरवली खरी पण भाकरी फिरवताना ती करपली असा सूर स्थानिकांमध्ये आहे.(Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT