mushtak shaikh, solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

६०० फुटांखालील पाणी शिवकालीन! आता गावोगावी पर्जन्यमापक; पाणाड्यांच्या पद्धती लयंच भारी

तात्या लांडगे

६०० फुटाखालील पाणी शिवकालीन

जमिनीतील २०० मीटरखालील (६०० फुटांखालील) पाणी हे शिवकालीन म्हणजेच ३७३ वर्षांपूर्वी असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. शिवकाळात पडलेला पाऊस आणि त्यावेळी जमिनीत मुरलेले ते पाणी आहे. हळूहळू जमिनीत पाणी मुरत असते. पाण्याची गुणवत्ता चव जमिनीतील खडकावर अवलंबून असते. आपल्याकडे बेसाल्ट खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो. दुसरीकडे आपल्याकडे खतांचा प्रचंड वापर केल्याने पाण्यात नायट्रेटचे प्रमाण आढळते. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे, असेही डॉ. शेख यांनी यावेळी आवाहन केले.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४८८ मिलिमीटर पाऊस पडतो, पण त्यातील अवघे सात ते दहा टक्के पाणी जमिनीत मुरते. तुलनेत दुसरीकडे पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात केला जात असल्याने जमिनीमधील पाण्याची पातळी अजूनही अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही.

जल पुनर्भरण काळाची गरज असून भविष्याचा वेध घेऊन सर्वांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे वास्तव मांडतानाच, वेळीच उपाययोजना नाही केल्यास भविष्यात पाणी टंचाईचे गहिरे संकट निर्माण होऊ शकते, अशा सूचक इशारा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये संवाद साधताना दिला.

खास करुन मोहोळ, माळशिरस, पंढरपूर व माढा या चार तालुक्यांमध्ये जमिनीतील पाण्याचा सर्वाधिक उपसा होत असल्याचेही त्यांनी यावेळी आवजून सांगितले. तत्पूर्वी, ‘सकाळ’ सोलापूर आवृतीचे निवासी संपादक अभय दिवाणजी यांनी ‘सकाळ’ परिवाराच्यावीने डॉ. शेख यांचे स्वागत केले.

जिल्ह्यातील ११४ गावांमध्ये अटल भूजल अभियान

पडणाऱ्या पावसाचे पाणी पुनर्भरणाच्या माध्यमातून जमिनीत मुरावे, यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अटल भूजल अभियान राबविले जाणार आहे. त्यात माळशिरस तालुक्यातील ६४, माढ्यातील १९, मोहोळ तालुक्यातील २३ व पंढरपूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे. त्या गावांचे जल आराखडे तयार केले असून त्यात लोकसंख्या, जनावरांची संख्या, गावातील पिके, पाऊस, जलसंधारणाची पद्धती, पाणी पातळी, याचा विचार केला आहे. ‘सकाळ’नेही त्यासाठी मदत केली आहे. गावातील प्रत्येकाला दररोज किमान ५५ लिटर पाणी मिळावे, असे समिकरण आहे. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. मागील पाऊस व जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे सध्या जिल्ह्याची पाणी पातळी ०.८० मीटरने वाढली आहे. जिल्हा सध्या टॅंकरमुक्त आहे.

नदीत २ मीटर वाळूचा थर फायद्याचा

सध्या नद्यांमधील वाळूचा अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना देखील पाणी टंचाईच्या छळा सोसाव्या लागत आहेत. नद्यांमध्ये पाण्याचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे नद्यांमध्ये पाणी टिकून राहावे, यासाठी किमान दोन मीटर थर वाळूचा असायलाच हवा. जेणेकरून नदी काठावरील गावांना, शेतीला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असेही डॉ. शेख यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रत्येक गावांमध्ये आता पर्जन्यमापक

दरवर्षी पावसाळ्यात गावाच्या हद्दीत किती पाऊस झाला, त्यातील किती पाणी जमिनीत मुरले आणि उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या उद्‌भवू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील, यादृष्टीने ग्रामपंचायतींना नियोजन शक्य आहे. त्यासाठी अटल भूजल अभियानाअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना आता पर्जन्यमापक यंत्र दिले जाणार आहे. सुरवातीला माढा, मोहोळ, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील११४ गावांना ती यंत्रे मिळतील, असेही डॉ. शेख यांनी सांगितले.

६०० फुटाखालील पाणी शिवकालीन

जमिनीतील २०० मीटरखालील (६०० फुटांखालील) पाणी हे शिवकालीन म्हणजेच ३७३ वर्षांपूर्वी असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. शिवकाळात पडलेला पाऊस आणि त्यावेळी जमिनीत मुरलेले ते पाणी आहे. हळूहळू जमिनीत पाणी मुरत असते. पाण्याची गुणवत्ता चव जमिनीतील खडकावर अवलंबून असते. आपल्याकडे बेसाल्ट खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो. दुसरीकडे आपल्याकडे खतांचा प्रचंड वापर केल्याने पाण्यात नायट्रेटचे प्रमाण आढळते. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे, असेही डॉ. शेख यांनी यावेळी आवाहन केले.

पाणाड्याची करामत लयंच भारी

पायाळू व्यक्ती पाणाडी म्हणून पाणी पाहतात, हे ऐकून आहे. काहीजण नारळ, लिंबाचा फोक, तवा, प्लेटवर पाणी पाहतात. डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही तो व्यक्ती बरोबर त्याच ठिकाणी थांबतो, जेथे तो डोळे उघडे ठेवून थांबला होता. दुसरीकडे पाणी असलेल्या ठिकाणी नारळ गरगर फिरतो. काही ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर तवा जोरात फिरतो, अशीही उदाहरणे आहेत. परंतु, ही पद्धत पूर्णपणे विश्वास ठेवण्यासारखी नसून त्याला कोणताही वैज्ञानिक पार्श्वभूमी नाही, असेही डॉ. शेख म्हणाले.

भूजल शास्त्रज्ञ डॉ. शेख यांच्याबद्दल...

  • - पूर्ण नाव : डॉ. मुश्ताक शेख

  • - मूळगाव : सोलापूर

  • - शिक्षण : एमएस्सी, एम.टेक, पीएच.डी

  • - पद : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT