सोलापूर : उजनी धरण १०० टक्के भरल्यावर पूरनियंत्रणासाठी ४ ऑगस्टपासून धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. आता पावसाळा संपला असून तीन महिन्यानंतर शुक्रवारी (ता. ८) कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. २०२४-२५ या वर्षातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.
गतवर्षीच्या दुष्काळात धरणातील पाणीसाठा तळाशी गेल्याने शेतकऱ्यांनाही पाण्याअभावी पिके सोडून द्यावी लागली होती. पण, यंदा जून ते ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली व विहिरी, तलाव देखील भरले आहेत. दुसरीकडे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ४ ऑगस्ट ते ८ नोव्हेंबरपर्यंत कालव्यामधून पाणी सोडण्यात आले.
१९८० रोजी धरण झाल्यापासून एवढे दिवस कालव्यामधून पाणी सोडण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २०२२ मध्ये १२ ऑगस्ट ते नोव्हेंबरअखेर कालव्यामधून पाणी सोडण्यात आले होते. जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांच्या सुमारे पावणेदोन लाख हेक्टरला थेट धरणाचे पाणी मिळते. त्यामुळेच रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. यंदा शेतकऱ्यांना जानेवारी ते जून या सहा महिन्यात किमान तीनदा धरणातून पाणी सोडले जाईल, पण त्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होईल असे जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दोन महिने बंद राहणार धरणाचे दरवाजे
उजनी धरणात एकूण १२३ टीएमसी पाणी मावते. धरणाला एकूण ४१ दरवाजे असून आता कालव्याचे पाणी बंद केल्यावर धरणाचे सगळेच दरवाजे बंद करण्यात आले आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर साधारणत: जानेवारीअखेरीस शेतकऱ्यांच्या मागणीवरून धरणातून पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी होत असल्याने भीमा नदीतून तीन-चारवेळा सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागणार नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना मागणीनुसार गरजेला पाणी सोडले जाणार असून तेवढा पाणीसाठा धरणात शिल्लक असणार आहे. तरीपण, भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांची गरज पाहून त्यांच्यासाठी आवर्तन सोडण्याचाही निर्णय होईल, असेही अधिकारी म्हणाले.
धरणातील पाण्याची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
१२३.२८ टीएमसी
पाण्याची टक्केवारी
११.२८ टक्के
उपयुक्त पाणीसाठा
५९.६२ टीएमसी
शेतकऱ्यांसाठी नियोजित आवर्तने
३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.