Unseasonal Rain  sakal
महाराष्ट्र बातम्या

संकटाच्या चक्रव्यूहात जगाचा पोशिंदा! एकरकमी FRP मिळेना, पीकविम्याचा अग्रिम, दुष्काळी- अवकाळीची भरपाईही नाही, कांदा, दुधाचे दर गडगडले

दुधाला २५ रुपयांचा दर, १५ दिवसानंतरही एकरकमी एफआरपी नाही, दुष्काळ, अवकाळीच्या मदतीची प्रतीक्षा, पीकविमा नाही. अशी चिंताजनक स्थिती असतानाही कांदा निर्यातबंदी आणि रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध. त्यामुळे जगाचा पोशिंदा सध्या अडचणींच्या चक्रव्यूहात अडकला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दुधाला २५ रुपयांचा दर, १५ दिवसानंतरही एकरकमी एफआरपी नाही, दुष्काळ, अवकाळीच्या मदतीची प्रतीक्षाच आणि पीकविमा भरूनही अद्याप २५ टक्के अग्रिम मिळाला नाही. अशी बळिराजाची चिंताजनक स्थिती असतानाही कांदा निर्यातबंदी आणि रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध, असे केंद्र सरकारचे निर्णय. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरीच सध्या अडचणींच्या चक्रव्यूहात अडकल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी व सांगोला या पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. दुसरीकडे इतर तालुक्यांमधील ४६ महसूल मंडळांमध्येही दुष्काळसदृश स्थिती असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून सावरताना रब्बीची पेरणी झाली, पण पुन्हा अवकाळीचा दणका, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पीकविम्यातून काहीतरी मदतीचा हातभार लागेल या आशेवरील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत २५ टक्के अग्रिम सुद्धा मिळालेला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्याप ना दुष्काळाची ना अवकाळीची मदत मिळाली. शासकीय योजनांच्या लाभासाठी पुरेसा निधी नसल्याने योजनेची प्रतीक्षा, शासकीय अनुदानही प्रलंबित, दुधाचे दर २५ रुपयांवर आले, आता कांद्याला अठराशे ते तीन हजारांपर्यंतच दर, या पार्श्वभूमीवर जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. त्यातही पुन्हा निकषांवर बोट ठेवत आठ शेतकरी कुटुंबाचे मदतीचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत हे विशेष.

बळिराजासमोरील अडचणींचा चक्रव्यूह

  • १) जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम यापूर्वीच मिळणे अपेक्षित होता. पण, आतापर्यंत ११७ कोटी रुपयांपैकी एक लाख ४० हजार शेतकऱ्यांनाच ८७ कोटींचा अग्रिम मिळाला आहे. अजूनही ६९ हजार शेतकऱ्यांना ३० कोटींचा अग्रिम मिळालेला नाही.

  • २) जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील साडेपाच ते सहा लाख शेतकऱ्यांच्या पाच लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. पण, केंद्राच्या पथकाने दुष्काळाची पाहणी करण्यास विलंब केला आणि बळिराजाची मदतही लांबली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यांमधून नुकसानीचे अहवाल मागविले, पण अद्याप एकाही तालुक्याचा अहवाल आलेला नाही.

  • ३) सततच्या दुष्काळाला मागे टाकून रब्बीतून काहीतरी हाती लागेल म्हणून पुन्हा नव्या उमेदीने अहोरात्र मेहनत करणाऱ्या बळिराजाला अवकाळीने दणका दिला. जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ४७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यासंदर्भातील नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पण, पंचनाम्याचे अहवाल अजूनही अपूर्णच आहेत.

  • ४) तळहातावरील फोडाप्रमाणे दुष्काळ, अवकाळीच्या संकटातही बळिराजाने कांदा पिकविला. आता कोठेतरी त्यांना समाधानकारक दर मिळू लागला, तेवढ्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि पाच हजाराचा दर दणक्यात अडीच हजारांवर खाली आला. दुसरीकडे रसापासून इथेनॉल तयार करण्यावरील निर्बंधाचाही निर्णय घेतला आणि कारखानदारांनी वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला, अशी स्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती

  • अवकाळी मदतीची प्रतीक्षा

  • ५३,०००

  • दुष्काळी मदतीची प्रतीक्षा

  • ६.०३ लाख

  • पीकविम्याचा अग्रिम न मिळालेले

  • ६९,०००

  • मदतीच्या प्रतीक्षेतील एकूण शेतकरी

  • ७.२५ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT