solapur alchol sakal
महाराष्ट्र बातम्या

गावागावांतील तरूण हातभट्टीच्या आहारी! 120 हातभट्ट्यांवर 15 लाख दारू निर्मिती; ‘हातभट्टीमुक्त गाव, ऑपरेशन परिवर्तन’ची राहिली नाही धास्ती; पोलिस कारवाईत सातत्य ठेवणार का?

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘हातभट्टीमुक्त गाव’ आणि ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन सुरू असतानाही जिल्ह्यातील १२० ठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील तरूण आहारी गेल्याची वस्तुस्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘हातभट्टीमुक्त गाव’ आणि ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन सुरू असतानाही अद्याप जिल्ह्यातील १२० ठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्याला अपायकारक हातभट्टी दारूच्या आहारी प्रत्येक गावातील तरूण गेल्याची वस्तुस्थिती असून यातून अनेक नवविवाहित तरूणी विधवा होत आहेत.

दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या समोरही न उभारणारे तरूण काही दिवसांनी एकमेकांच्या संगतीतून सुरवातीला एन्जॉय म्हणून मद्यपान करतात. खिशात ज्यावेळी पैसा नसतो त्यावेळी तेच तरूण गावात सहजपणे मिळणाऱ्या हातभट्टी दारूचा ग्लास तोंडाला लावतात. गंभीर बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील १९ महिन्यात केलेल्या कारवाईत दारू निर्मितीचे प्रमाण १६ टक्क्यांनी, विक्रीचे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

गावकरी स्थानिक पोलिसांना निवेदने देऊन थकले. ‘डायल ११२’वर देखील मद्यपान करून पती किंवा शेजारील भांडण करीत असल्याचे कॉल वाढले आहेत. चिंतेची बाब म्हणजे अनेक गावांनी दारूबंदीचे ठराव केले आहेत, तरीसुद्धा त्याच गावांमध्ये बिनधास्तपणे हातभट्टी विक्री होत आहे. पोलिस ठाण्यांपर्यंत येणाऱ्या बहुतांश तक्रारीस मद्यपान हेच प्रमुख कारण असते. तरीसुद्धा अशा अवैध धंद्याचा मुळापासूनच बिमोड व्हावा, यासाठी पोलिसांचे फारसे प्रयत्न दिसत नसल्याचेही त्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक हातभट्टी निर्मितीचे अड्डे आहेत. पोलिस यंत्रणेला आव्हान देऊन अवैध व्यावसायिक बिनधास्तपणे वाहनांमधून जिल्हाभर हातभट्टी पोचवितात, अशीही वस्तुस्थिती आहे.

‘एक्साईज’चे अधिकारी म्हणतात ‘या’ क्रमांकावर संपर्क करा

जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉट्सअप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

‘एक्साईज’ची १९ महिन्यातील कारवाई

  • हातभट्टी चालकांविरूद्ध गुन्हे

  • ९८४

  • हातभट्टी विक्रेत्यांवरील गुन्हे

  • ६७९

  • हातभट्टी वाहतूक करण्यांवर गुन्हे

  • २१६

  • हातभट्टीचे रसायन नष्ट

  • २० लाख लिटर

  • हातभट्टी दारू जप्त

  • ९१ हजार लिटर

कारवाईत सातत्य नाही, नवतरूण अवैध व्यवसायात

ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत आठवड्यातून दोन ते तीनवेळा हातभट्टीच्या अड्ड्यांवर कारवाई अपेक्षित आहे. अवैध व्यवसायातील तरूणांसह अन्य व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांना या व्यवसायापासून परावृत्त करणे, त्यांच्या हाताला पर्यायी काम मिळवून देण्याचा प्रयत्न करणे देखील अपेक्षित आहे. मात्र, या बाबींकडे मागील काही महिन्यांपासून दुर्लक्ष झाल्याने अशा अवैध व्यवसायात गुंतलेल्यांची संख्या वाढल्याचीही स्थिती आहे. ग्रामीण पोलिसांच्या जोडीला राज्य उत्पादन शुल्क विभाग असतानाही जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती, विक्री बंद होत नाही, हे विशेषच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT