Social Media eSakal
महाराष्ट्र बातम्या

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पोलिस तपासात ग्रुप ॲडमिन व त्या ग्रुपवर पोस्ट टाकणारा कोणी दोषी आढळल्यास पहिल्या गुन्ह्याला आरोपीला पाच वर्षांपर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांचा दंड होवू शकतो, अशी कायद्यात तरतूद आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राजकीय, धार्मिक, सामाजिक व अभिलेखावरील गुंड प्रवृत्तीच्या, शरिरविषयक गुन्हेगार, टोळ्या अशा लोकांच्या सोशल मिडियावरील (युट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर व व्हॉट्‌सॲप) हालचालींवर सायबर पोलिसांचे लक्ष आहे. तत्पूर्वी, शहर सायबर पोलिसांनी २० ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या विधानसभेच्या रणधुमाळीत व लोकसभा निवडणुकीवेळी तब्बल ९९ जणांवर कारवाई केली आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज (सोमवारी) संपला असून आता सायबर पोलिसांसह अन्य पोलिस जिल्ह्यातील उमेदवार व त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील मतदारसंघांमध्ये चार हजारांवर तर ग्रामीणमध्ये आठ हजारांपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. आज सायंकाळपासून उद्या (मंगळवार) दिवस-रात्र पोलिसांचे संशयित हालचालींवर वॉच असणार आहे.

पोलिस प्रमुखांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. शहर-ग्रामीणमधील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी देखील करण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, फोटो मॉर्फिंग अशा बाबींवरही विशेष लक्ष आहे. त्यासाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या निर्देशानुसार विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज (सोमवारी) संपला असून आता सायबर पोलिसांसह अन्य पोलिस जिल्ह्यातील उमेदवार व त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील मतदारसंघांमध्ये चार हजारांवर तर ग्रामीणमध्ये आठ हजारांपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. आज सायंकाळपासून उद्या (मंगळवार) दिवस-रात्र पोलिसांचे संशयित हालचालींवर वॉच असणार आहे. पोलिस प्रमुखांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. शहर-ग्रामीणमधील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी देखील करण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, फोटो मॉर्फिंग अशा बाबींवरही विशेष लक्ष आहे. त्यासाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या निर्देशानुसार विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सोशल मिडियावर लक्ष ठेवले जात आहे

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडीया मॉनिटर सेल उघडला आहे. या सेलमध्ये एक पोलिस उपनिरीक्षक, एक हवालदार व पाच अंमलदारांची नेमणूक केली आहे. या पथकाकडून सोशल मिडियावर लक्ष ठेवले जात आहे. कोणीही सोशल मिडियावर आक्षेपार्ह मेसेज, फोटो, व्हिडिओ टाकू नयेत किंवा एकमेकांना शेअर करु नयेत, अन्यथा निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस, सोलापूर शहर

सायबरची अशी कारवाई

  • एकूण प्रकरणे

  • ९९

  • प्रतिबंधात्मक कारवाई

  • ३२

  • पोस्ट हटविल्या

  • ३०

  • दखल-अदखलपात्र गुन्हे

  • १८

  • पोलिस ठाण्यात प्रलंबित

  • १९

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा

आयटी ॲक्ट ६७ अंतर्गत व्हॉट्‌सॲपवर आलेली आक्षेपार्ह पोस्ट त्या ग्रुपवर आल्यावर आणि ती पुढे तशीच फॉरवर्ड झाल्यास त्या व्यक्तीसोबतच ग्रुप ॲडमिनही तेवढाच जबाबदार धरला जातो. पोलिस तपासात ग्रुप ॲडमिन व त्या ग्रुपवर पोस्ट टाकणारा कोणी दोषी आढळल्यास पहिल्या गुन्ह्याला आरोपीला पाच वर्षांपर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांचा दंड होवू शकतो, अशी कायद्यात तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT