Ambulance Google
महाराष्ट्र बातम्या

रुग्णवाहिकांसाठी चालकच नाहीत! २०० खाटांचे सोलापूरचे जिल्हा रुग्णालय अन्‌ रुग्णवाहिका अवघ्या २; लोकार्पण उरकल्यानंतरही रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु नाही

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. सध्या या ठिकाणी कंत्राटी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण, आंतररुग्ण व अपघात विभाग सुरू झाले आहेत. पण, २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाकडे (१०० खाटा महिला व शिशू रुग्णालय आणि १०० खाटा सर्वोपचार रुग्णालय) स्वत:च्या अवघ्या दोन रुग्णवाहिका असून त्याला पण चालक नाहीत हे विशेष. गरज भासल्यास दुसरीकडून चालक बोलावून घेतले जातात, असे सूत्रांनी सांगितले.

सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील खाटांची क्षमता अंदाजे ७०० आहे, तरीपण त्याठिकाणी नेहमीच एक हजारापर्यंत रुग्ण असतात. सोलापूरसह परजिल्ह्यातून व परराज्यातूनही त्याठिकाणी रुग्ण येतात. आता जिल्हा रुग्णालय सुरू झाल्यामुळे शहर-जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. पण, लोकापर्णानंतरही त्याठिकाणी संपूर्ण क्षमतेने रुग्णसेवा सुरू नाही. चिंतेची बाब म्हणजे २०० खाटांच्या या रुग्णालयाकडे अवघ्या दोन रुग्णवाहिका असून त्यासाठी चालक अजूनही भरलेले नाहीत.

पदभरतीची प्रक्रिया असते, त्यानुसार कार्यवाही सुरू असून काही दिवसात चालक मिळतील, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. जिल्ह्याची लोकसंख्या वाढल्याने १०८ रुग्णवाहिका कमी आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन जास्त, अशी सद्य:स्थिती आहे. त्यातच पुन्हा जिल्हा रुग्णालयाकडील रुग्णवाहिका सध्यातरी चालकाविनाच आहेत.

प्रसुती शस्त्रक्रियेलाही प्रतीक्षा

नूतन जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन काही दिवसांत सुरू होईल अशी आशा आहे. प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटर सुरू करण्यापूर्वी त्याठिकाणी संपूर्ण निर्जंतुकीकरण अपेक्षित असून त्यासंबंधीचे आणखी दोन रिपोर्ट यायचे आहेत. ते अहवाल आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील प्रसुती शस्त्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. तर जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही कामे थांबली असल्याचेही सांगण्यात आले.

१०८च्या १८ रुग्णवाहिका कमी

शासनाच्या निकषांनुसार ग्रामीण भागात एक लाख लोकसंख्येसाठी १०८ची एक तर शहरी भागात दोन लाख लोकसंख्येसाठी एक रुग्णवाहिका अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या आता अंदाजे ४३ लाखांहून अधिक असतानाही सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी केवळ ३५ रुग्णवाहिका आहेत. यात आणखी १८ रुग्णवाहिकांची गरज आहे. आता जिल्हा रुग्णालयाकडे पुरेशा रुग्णवाहिका नसल्याने १०८ रुग्णवाहिकेवरील ताण आणखी वाढणार आहे.

१०२ रुग्णवाहिकेवर रुग्णसेवेचे निर्बंध

जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांसाठी देखील प्रत्येकी एक, अशा १०२ च्या एकूण ९४ रुग्णवाहिका आहेत. १०२ या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्याठिकाणी रुग्णसेवा केली जाते. पण, गर्भवती माता व एक वर्षापर्यंतच्या गंभीर आजारी बालकांनाच या रुग्णवाहिकेची सेवा मिळते. इतर रुग्णसेवेसाठी या रुग्णवाहिकांना इंधन मिळत नाही, असे जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates: भाजपच्या पहिल्या यादीत 'लाडक्या बहिणी'चा हुकमी एक्का; गेम चेंजर ठरणार की..?

Vidhan Sabha जागांवरून मविआतील वाद विकोपाला? ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार? Maharashtra Politics

BJP Candidates List : भाजपच्या विधानसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतून दोन आमदरांचा पत्ता कट... 'या' दिग्गजांना मिळाली संधी

फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील...भाजपच्या पहिल्या यादीनुसार कोण कुठून लढणार? वाचा संपूर्ण यादी

IND vs NZ: कर्णधार रोहितचा सर्फराजच्या शतकानंतर KL Rahul ला निर्वाणीचा इशारा? म्हणाला, 'त्यांना माहित आहे की...'

SCROLL FOR NEXT