Mpsc exam sakal
महाराष्ट्र बातम्या

वार्षिक कॅलेंडरनुसार परीक्षा नाहीत, ‘MPSC’चे सदस्य नाराज! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र अन्‌ राज्यसेवा पूर्व परीक्षेची २३ सप्टेंबरला ठरणार तारीख; सरकारच्या मागणीपत्रात संयुक्त पूर्व परीक्षा अडकली

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संभाव्य वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करता यावी, त्यांच्यावर परीक्षेचा तथा अभ्यासाचा ताण राहू नये म्हणून आयोगाच्या परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. मात्र, २०२४-२५ या वर्षात त्या कॅलेंडरनुसार काहीच कार्यवाही झालेली नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संभाव्य वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करता यावी, त्यांच्यावर परीक्षेचा तथा अभ्यासाचा ताण राहू नये म्हणून आयोगाच्या परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. मात्र, २०२४-२५ या वर्षात त्या कॅलेंडरनुसार काहीच कार्यवाही झालेली नाही. विद्यार्थ्यांना त्यासाठी सातत्याने आंदोलने करावी लागली आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या बहुतांश सदस्यांनी ‘एमपीएससी’तील प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली.

‘एमपीएससी’च्या वतीने दरवर्षी संयुक्त पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, दोन्हीच्या मुख्य परीक्षा व अन्य परीक्षा कधी होतील, यासंबंधीचे एक वार्षिक कॅलेंडर तयार करण्यात येते. त्यानुसार खेड्यापाड्यातून अधिकारी होण्यासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना तयारी करणे सोयीचे होते. मात्र, एकाच विद्यार्थ्याने दोन-दोन परीक्षा दिल्या आहेत, तरी त्याचे निकाल जाहीर झाले नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे आतापर्यंत चारवेळा राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, पण त्यापूर्वी आयोगातील सदस्यांना त्याची माहिती देखील दिली गेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले. आता परीक्षा घेण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला. याशिवाय अनेक मंत्री, आमदार, खासदारांनीही परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी आयोगातील काही सदस्यांनी परीक्षा कोणाला विचारून पुढे ढकलल्या आणि आतापर्यंत नवीन तारीख का जाहीर केली नाही, याचा जाब आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारल्याचेही सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राग...

तीनवेळा परीक्षा पुढे ढकलावी लागल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा नियोजित होती. प्रवेशपत्र देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोच केली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाला परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर २२ ऑगस्टच्या पत्रानुसार परीक्षेची पुढील तारीख लवकरच कळवू, असे आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप तारीख जाहीर केली नसून आता २३ सप्टेंबरला तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. परीक्षा पुढे ढकलावी म्हणून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा घ्या म्हणून आंदोलन करण्याची वेळ आल्याची सद्य:स्थिती आहे.

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील अडीच लाख विद्यार्थी राज्यसेवेच्या परीक्षेची वाट पहात आहेत. दुसरीकडे आयोगाच्या वार्षिक कॅलेंडरनुसार साधारणत: एप्रिल महिन्यात संयुक्त पूर्व परीक्षा होणे अपेक्षित असताना देखील सप्टेंबर संपतोय, तरी ती परीक्षा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून परीक्षा तातडीने घेण्यासाठी आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे.

लवकरच तारीख जाहीर होईल

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख २३ सप्टेंबरच्या बैठकीनंतर जाहीर होईल. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची पुढची तारीख प्रसिद्ध केली जाईल. त्यावेळी परीक्षा होणार आहे हे सर्वांनाच समजेल.

- सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Assembly Election 2024 Result: मालेगाव मध्यने थंडीत फोडला घाम; जिल्ह्यातील 14 मतदारसंघांचे निकाल निर्धारित वेळेत

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT