Bridge Course Canva
महाराष्ट्र बातम्या

सेतू अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध करण्याची होतेय शाळांकडून मागणी !

सेतू अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध करण्याची होतेय शाळांकडून मागणी !

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

ब्रीज कोर्सचे पडघम शाळांमध्ये वाजू लागले आहेत. मात्र, हा अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध नसल्याने तो कसा राबवायचा, याचे कोडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पडले आहे.

माळीनगर (सोलापूर) : सेतू अभ्यासक्रम (Bridge Courses) इंग्रजीत उपलब्ध नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच मराठी माध्यमातील सेमी इंग्रजीच्या वर्गातील विद्यार्थ्यांपुढे हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक व पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सेतू अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध करून देण्याची मागणी शाळांकडून होत आहे. (There is a demand from schools to make bridge courses available in English)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) (State Council for Educational Research and Training) राज्यस्तरावर दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) तयार केला आहे. 1 जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीत त्याची अंमलबजावणी करायची आहे. कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. "शाळा बंद, पण शिक्षण सुरू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण त्या काळात देण्यात आले. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तेतील विषयनिहाय क्षमता विकसित होण्यात अडचणी आल्या. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय उजळणीसाठी सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच इयत्तानिहाय अभ्यासक्रमाची अध्ययन - अध्यापन प्रक्रिया सुरू करायची आहे.

या अभ्यासक्रमाच्या मराठी व उर्दू माध्यमातून मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्र या विषयांसाठीच्या पीडीएफ एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आल्या आहेत. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरूही झाली आहे. ब्रीज कोर्सचे पडघम शाळांमध्ये वाजू लागले आहेत. मात्र, हा अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध नसल्याने तो कसा राबवायचा, याचे कोडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पडले आहे.

विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याकडे पालकांचा कल असायचा. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी संख्येची अडचण यायची. इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबर स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यातील मराठी माध्यमाच्या बहुतांश प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून सेमी इंग्रजीचे वर्ग चालविले जात आहेत. त्याद्वारे या शाळांमध्ये गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीत शिकवले जातात. त्यामुळे या शाळांना देखील गणित व विज्ञानाच्या सेतू अभ्यासक्रमासंदर्भात अडचणी येत आहेत.

सेतू अभ्यासक्रमाचे इंग्रजीत रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या पीडीएफ लवकरच संकेतस्थळावर अपलोड होतील.

- दिनकर टेमकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT