Samruddhi Mahamarg Driving esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गेल्या ११ महिन्यात झाले तब्बल इतके अपघात

सकाळ डिजिटल टीम

Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्ग खुला झाल्यानंतर ११ डिसेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनेक गंभीर अपघात घडले. महामार्गावर गेल्या ११ महिन्यांत एकूण १,०४० अपघातांची नोंद झाली.

त्यात ६४ प्राणांतिक अपघात, १३० गंभीर जखमी होणारे, ३२९ किरकोळ जखमी होणारे; तर ५१७ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची नोंद महामार्ग पोलिसांच्या अहवालात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अतिवेगामुळे झालेल्या अपघातांमध्ये एकूण १३२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

समृद्धी महामार्गावर नागपूर विभागात सर्वाधिक अपघातांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये खुर्सापूरमध्ये ५५ अपघात, जाम येथे ११७ अपघातात १५ मृत्यू, धामणगाव रेल्वे येथे १३१ अपघात ९ मृत्यू, आमनी २१६ अपघातांत १० मृत्यू, मलकापूरमध्ये १३७ अपघातांमध्ये सर्वाधिक ४६ मृत्यू झाले आहेत.

महामार्गावर नागपूर विभागात ६५६ अपघातांमध्ये ८० मृत्यूची नोंद झाली आहे; तर औरंगाबाद २१५ अपघातात २४ मृत्यू; जालना ११७ अपघात १२ मृत्यू, भाबलेश्र्वर २२ अपघात ९ मृत्यू, घोटी ४ अपघात, सिन्नर २५ अपघात ७ मृत्यू, असे एकूण १०४० अपघातांमध्ये १३२ मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महामार्ग पोलिस विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT