नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला आता हळूहळू रंग चढायला लागला आहे. त्यातच राजकीय नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचा खेळही सुरु झाला आहे. अजित पवारांसोबत गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांसोबत असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती.
यानंतर आमच्याकडं आणखी इनकमिंग होईल आणि त्या मागचं कारणंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (there will be more incoming happened sharad pawar clearly said it)
जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रमाणं तुमच्या पक्षात इनकमिंग वाढत चाललं आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "हे इनकमिंग आणखी झालेलं दिसेल. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल"
दरम्यान, अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागा वाटप पूर्ण झालेलं नाही. काही जागांवर अद्यापही खलबतं सुरुच आहेत. एकदा महायुतीचं संपूर्ण जागा वाटप झालं आणि त्यात इच्छुकांना जर संधी मिळाली नाही तर हे लोक दुसऱ्या पक्षात संधी शोधत येतात. त्यानुसार, अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येतील असा दावाच शरद पवारांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)
या पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर भाष्य केलं असून आपला त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. केजरीवाल हे तीन वेळा मुख्यमंत्री बनले आहेत, त्यांना जनतेचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळं केजरीवालांवर सुडापोटी ईडीची कारवाई करवनं भाजपला चांगलचं महागात पडणार असल्याचं भाकीतही यावेळी शरद पवार यांनी केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.